धर्म हा आचरणाचा विषय आहे त्याला मिरविण्याचा आभूषण बनवू नये – मो.शकील जाफरी

सदानंद शेवाळे
विभागीय संपादक
७ जुलै २०२२


“धर्म हा आचरणाचा विषय आहे त्याला मिरविण्याचा आभूषण बनवू नये आणि अंधश्रद्धा, व्यसन आणि धर्मांधता आपल्या देशाला लागलेली कीड आहे” असे विचार मंचरचे सामाजिक कार्यकर्ता, जादूगार आणि बहुभाषिक कवी मो. शकील जाफरी यांनी व्यक्त केले. चास या गावी संत ज्ञानेश्वर ज्येष्ठ नागरिक संघच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते, “जाती, धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्ती एक भारतीय म्हणून जगण्याचा प्रयत्न केले तर निश्चितच आपला भारत देश महासत्ता होईल” असं ते पुढे म्हणाले.

या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी असलेले मो. शकील जाफरी यांनी जादूच्या प्रयोगांचा माध्यमातून अंधश्रद्धा, व्यसन, धर्मांधता इत्यादी देशाला पोखरून टाकणारे विविध विषयांवर प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.यावेळी चंद्रकांत बाबुराव बारवे, लक्ष्मण विठ्ठल भोर, ज्ञानेश्वर शंकर भोर, सौ सुनीताअभिमन्यू शेगर इत्यादी ८जणांचा वाढदिवसानिमित्ताने सत्कार करण्यात आले. समारंभाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष मारुती भोर यांनी केले. मो. शकील जाफरी यांचा परिचय माजी अध्यक्ष ए. एफ. इनामदार सर यांनी केले.

या कार्यक्रमास उपसरपंच शिवाजी बारवे, माजी उपसरपंच श्रीकांत चासकर, एकनाथ शंकर भोर, दशरथ गणपत भोर, रघुनाथ बारवे, संदीप पोकळे, उपाध्यक्ष एस बी बारवे सर आणि शंकर रावजी बारवे यांच्यासह बहुसंख्येने ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एफ. इनामदार सर यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष जी. के. चासकर यांनी मानले.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *