भोसरीत साजरी झाली ’एक संक्रांत कुंकवापलिकडची’

पिंपरी : त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या श्रीराम विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय, रामनगर,  भोसरी यांच्या वतीने मंगळवारी एका वेगळ्या हळदीकुंकवाचे आयोजन करण्यात आले होते. विभाग प्रमुख व ज्येष्ठ शिक्षिका सुनिता भोसले यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वैधव्य प्राप्त झालेल्या महिलांना निमंत्रित करण्यात आले होते.

कै. उमाताई गुळवे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम देवी सरस्वती आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाला  मंगल पाटील, लता नाणेकर, शुभांगी शेळके, मिना आखाडे, रेणुका वायदंडे या शिक्षिका तसेच अलका झांबरे, मंगल करपे, संगिता निकम, विद्या पाटील, सुवर्णा सावंत, शकुंतला पांचाळ या गृहिणी तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संगिता हुंबे उपस्थित होत्या. माजी नगरसेविका प्रियांका बारसे, अनुराधा गोफणे, मंगल पाटील, मिना आखाडे , विद्या पाटिल, शिक्षक प्रतिनिधी राजश्री जाधव, पालक प्रतिनीधी वर्षा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा कालेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माध्यमिक विभाग प्रमुख सीमा शिंदे व दोन्ही विभागाच्या सर्व महिला शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.तसेच आपला आवाज आपली सखी च्या भोसरी विभागातील प्रतिनिधी धनश्री जुवेकर यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *