कोरोना काळात देवदूत ठरलेल्या डॉ पिंकी कथे यांचा अनोखा प्रवास…रेडिओलॉजी क्षेत्रामध्ये पायोनियर ठरलेल्या डॉ पिंकी कथे यांचा डॉक्टर्स डे निमित्त संदेश…

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
एक जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील रेडिओलॉजी विभागामध्ये अल्पावधीत लोकप्रियता मिळवलेल्या डॉ. पिंकी कथे यांना अनेक संस्थांनी कोरोना महामारी च्या काळामध्ये गौरविले आहे. डॉक्टर्स डे निमित्त त्यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्क बरोबर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जुन्नर तालुक्यामध्ये रेडिओलॉजी क्षेत्रात पायोनिअर ठरलेल्या आणि नामांकित रेडिओलॉजिस्ट म्हणून पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या डॉ. पिंकी कथे व प्राध्यापक डॉ.पंजाब कथे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर या रोपट्याचा आज बनलेला वटवृक्ष, हा त्यांच्या आजवरच्या अथक परिश्रम, चिकाटी, दूरदृष्टी, सातत्य, अनुभव आणि कौशल्याची साक्ष देत अभिमानाने उभा आहे. कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड थांबवण्याकरिता नारायणगांव, जुन्नर, मंचर, आळेफाटा आणि नव्यानेच सुरु झालेल्या राजगुरूनगर शाखेमार्फत देवदूताप्रमाणे २४ तास अखंड सेवा प्रदान करत रुग्णांना आवश्यक ते उपचार तातडीने मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या कोरोनायोद्धा डॉ. पिंकी कथे यांचा इथपर्यंतचा प्रवास मात्र अतिशय खडतर होता.

Advertise


सन २००१ साली डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज येथून त्यांनी एम.बी.बी.एस. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २००२ मध्ये इंटर्नशिप पूर्ण करून सन २००५ मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर-पदवी यशस्वीरीत्या प्राप्त केली. आकाशाला गवसणी घालणारे अनेक करिअरचे पर्याय समोर उपलब्ध असतानादेखील ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा अभाव लक्षात घेऊन जुन्नर तालुक्यातील नारायणगांव या ठिकाणी डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर या नावाने पहिली शाखा सुरु केली. आज डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या केवळ जुन्नरच नव्हे तर आंबेगाव आणि खेड तालुक्यातही अनेक शाखा कार्यरत आहेत की ज्या ठिकाणी १.५ टेस्ला एम.आर.आय., मल्टिस्लाईस सी.टी.स्कॅन, ३डी-४डी सोनोग्राफी, कलर डॉपलर, स्ट्रेस टेस्ट, डिजिटल एक्स-रे, डिजिटल ओ.पी.जी.,२डी इको, इ.सी.जी., इ.इ.जी.,पी.एफ.टी., इंडोस्कोपी आणि ऍडव्हान्स पॅथॉलॉजी लॅब की ज्या ठिकाणी रुटीन व स्पेशल सर्व प्रकारच्या तपासण्या करता येतील, यांसारख्या अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.
डॉ.पिंकी कथे या केवळ इथवरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी हे सर्व मशिन्स कुशलतेने हाताळण्याकरिता प्रशिक्षित तंत्रज्ञ आपल्याच भागात निर्माण व्हावेत याकरिता व त्यानिमित्ताने लोकांच्या हाताला रोजगार लागावा, या उदात्त भावनेतून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांमध्ये डॉ. कथे पॅरामेडिकल इन्स्टिटयूट या नावाने एक पॅरामेडिकल इन्स्टिटयूटदेखील सुरु केले आहे. की ज्या ठिकाणी रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, फिजिओथेरपी, ऑपरेशन थिएटर व नर्सिंग असिस्टंस यांसारखे विविध डिग्री व डिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध आहेत. एकीकडे अचूक आणि वेगाने रोगनिदान करणारी अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा आणि ती यशस्वीरितीने हाताळणारे प्रशिक्षित तंत्रज्ञ निर्माण करणारा अभ्यासक्रम अशा दोन गोष्टींचा सुरेख संगम साधण्याची अनोखी किमया डॉ.पिंकी कथे यांनी साध्य करून दाखवली आहे.
या ठिकाणी रुग्णाचा जीव वाचवण्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले जात असल्याने, येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या उक्तीचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आज कोरोना महामारीच्या काळात रुग्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, या भयंकर साथीशी लढण्यासाठी लोकांना आत्मविश्वास प्रदान करीत रुग्णांचे जीव वाचवण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या डॉ.पिंकी कथे, आजही आपल्या यशाचे श्रेय आपल्या शिक्षकांना, आपल्या कुटुंबाला आणि जुन्नर, आंबेगावसह खेड तालुक्यातील लोकांना देतात. रुग्णांचे हित लक्षात घेऊन अविरत सेवा बजावणाऱ्या डॉ. पिंकी कथे व डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर यांच्यावतीने सर्वांना डॉक्टर्स दिनाच्या शब्दरूपी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *