जुन्नर तालुक्यात बोगस बी बियाणे विक्री करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
७ जुलै २०२२

ओझर


पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील स्थानिक शेतकरी दत्तात्रय तुकाराम वर्हाडी यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे बोगस सोयाबीन बियाणे संदर्भात केलेल्या तक्रारीस अनुसरून तालुका कृषी अधिकारी श्री निलेश बुधवंत तसेच जिल्हास्तरीय इन्स्पेक्टर यांच्या तर्फे महाराजा 555 या नावाने सोयाबीनची 20 किलो बॅग प्रति 3200 रुपये याप्रमाणे स्थानिक शेतकरी दत्तात्रय तुकाराम वर्हाडी यांना विक्री करत असताना स्टिंग ऑपरेशन करून संबंधित दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका नामांकित कंपनीच्या नावाखाली बोगस बियाणे चा ब्रँड बनवून विक्री करत असताना तसेच रक्कम स्वीकारत असताना संबंधित दोघा व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.

यावेळी तक्रारदार दत्तात्रय तुकाराम वर्हाडी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे, मनसेचे रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश शेळके, मनसेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, बाधित शेतकरी आणि संबंधित यंत्रणा हे सर्व हजर होते. अशाप्रकारे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या व्यक्तीमुळे तालुक्यातील चांगल्या प्रतीचे बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांचे नाव विनाकारण खराब होते. बियाणांची विक्री व्हावी शेतकरी आणि विक्रेता यांच्यामधील विश्वास तुटू नये यासाठी विक्रेत्यांनी सर्व कायद्यांचे पालन करून बियाणांची विक्री करावी असे मत मनसेचे रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश शेळके यांनी व्यक्त केले. तसेच बाधित शेतकरी दत्तात्रय तुकाराम वर्हाडी यांनी देखील बोगस बी बियाणे विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे.

विनापरवाना बियाणे विक्री करणारे आणि शेतकऱ्यांना नाहक वेठिस धरणारे विक्रेते आढळल्यास जरूर जुन्नर तालुका मनसे… आम्हा शेतकरी या सर्वांना संपर्क करावा असे मत व्यक्त केले आहे. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके,मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील आणि गणेश शेळके पुढील पाठपुरावा करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *