अफूची झाडे महिलेच्या शेतात : शिक्रापूर पोलिसांनी केली कारवाई

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१० मार्च २०२२

शिक्रापूर


शिरूर तालुक्यातील मौजे आरणगाव येथील ताई संतोष मकर, या महिलेच्या शेतात चक्क अफूची ६९ झाडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारण या अफूच्या लागवडीस प्रतिबंध असून, तसे केल्यास कायद्याने गुन्हा आहे. अफू हा एक अमली पदार्थ असून, तो नशा चढणारा व शरीराला आणि आरोग्याला घातक म्हणून, ते बाळगण्यास मनाई आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील आरणगाव येथील एका शेतात, गट नंबर ९० मध्ये, एकूण ६९ अफूची झाडे आढळल्याने, शिक्रापूर पोलिसांनी एका महिलेवर “गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ, अधिनियम १९८५ चे कलम ८ (ख), २० (ब) प्रमाणे कायदेशीर कारवाई केलेली आहे. या अफूच्या हिरव्या रंगाची पाने असणाऱ्या ६९ झाडांवर, हिरवी गोल बोंडे असून, त्यांचे वजन सुमारे ९ किलो आहे. याची बाजारभावाप्रमाणे किंमत रु. ४,५०,०००/- इतकी आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *