हल्ली पाश्चात्त्य संस्कृतीचा आहे रेटा, संस्कृती संवर्धनासाठी बांधायला शिकू फेटा

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१० मार्च २०२२

चिंचवड


चिंचवड पोलीस स्टेशन महिला दक्षता समिती च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवड पोलिस स्टेशन मधील महिला पोलिसांसाठी एक आगळावेगळा संस्कृती संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला तो म्हणजे पारंपारिक फेटा प्रशिक्षणाचा. फेटा प्रशिक्षिका विद्या जितेंद्र जोशी यांनी हे फेटा प्रशिक्षण दिले.आपली मराठमोळी परंपरा पुढे न्यावी, संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उद्देशाने विद्या जोशी नेहमीच फेटा प्रशिक्षण आयोजित करीत असतात. यासाठी महिला दक्षता समिती अध्यक्षा निर्मला जगताप , वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे , पोलीस निरीक्षक गुन्हे किशोर पाटील, पी एस आय दिक्षा झडते तसेच इतर महिला पोलीसांचे सहकार्य लाभले.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून आम्हाला खूप आनंद आणि वेगळेपणाची अनुभव मिळाला. वर्दी मध्ये खूप कमी वेळा फेटा बांधला जातो . वर्दी मध्ये फेटा बांधण्याची आनंदी संधी मिळाली असा अभिप्राय महिला पोलिसांनी व्यक्त केला. अतिशय उत्सुकतेने फेटा बांधण्याची कला शिकणे हे खूप गमतीचे आनंदाचे आणि संस्कृती संवर्धनाचे वाटले असे मत महिला पोलिसांनी व्यक्त केले. लहान मुलांचे स्नेहसंमेलन आपले पारंपरिक सण-उत्सव लग्नकार्यांमध्ये फेटा बांधल्याने कार्यक्रमाची शोभा वाढते. पण हल्ली फेटा बांधता येत नसल्यामुळे आपला संस्कृतीक फेटा कुठेतरी मागे पडत चालला आहे हाच फेटा पुन्हा आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी, पुढच्या पिढीमध्ये दिमाखात बांधला जाईल आणि आपल्या संस्कृतीचा दिमाख मिरवण्यासाठी आपण सगळे तयार होऊ या उद्देशाने विद्या जोशी यांनी सुरू केलेले हे फेटा प्रशिक्षण अतिशय उपयुक्त वाटले.

पोलीस स्टेशनमध्ये होणाऱ्या इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी आम्ही प्रयत्नपूर्वक जरूर फेटा बांधण्याचा प्रयत्न करू असे मत महिला पोलिसांनी व्यक्त केले. यावेळी पोलिस स्टेशनमधील महिला पोलिस इतर पोलिस कर्मचारी तसेच चिंचवड पोलीस स्टेशन दक्षता समिती च्या इतर सदस्य देखील हजर होत्या.असा हा सांस्कृतिक फेटा बांधायचा आणि आपल्या संस्कृतीचा दिमाख मानाने मिरवायचा हे मात्र सगळ्या प्रशिक्षण घेतलेल्या पोलीस महिलांनी आवर्जून करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *