मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे रोबोसॉकर स्पर्धेमध्ये यश

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
१० मार्च २०२२

ओझर


मांजरी बु: मांजरी बुद्रुकमधील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील पी.डी.ई.ए. टीम ज्यागवॉरने राष्ट्रीय स्तरावरील रोबोसॉकर स्पर्धेत नाविन्यपूर्ण कामगिरी करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. भारतीय विद्याभवनचे सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, अंधेरी येथे “स्पेक्ट्राफेस्ट ” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील पी.डी.ई.ए. टीम ज्यागवॉरमधील परिक्षित थोरात, विनायक काळभोर, सुरज साबळे, रोहन पाटील, विशाल शिरफुले, आकाश लंके, अनिकेत साळुंखे, महेश बनवसे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए. एम. जाधव, प्राचार्य डॉ.आर.व्ही.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *