संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाजगे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
तीस आशा वर्कर्स,आठ रुग्णवाहिका चालक दोन गॅस शवदाहिनी कर्मचाऱ्यांचा समावेश
नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
नारायणगाव येथील विक्रांत नागरी सहकारी पतसंस्था,विक्रांत क्रीडा मंडळ आणि श्री. गणेशोत्सव मंडळ वाजगे आळी यांच्या वतीने विक्रांत पतसंस्थेचे संस्थापक व माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तीस आशा वर्कर्स,आठ रुग्णवाहिका चालक आणि दोन गॅस शवदाहिनी कर्मचारी यांची कोरोना कवच विमा पॉलिसी नुकतीच उतरवण्यात आली अशी माहिती संस्थेचे सचिव निलेश गोरडे आणि संचालक मुकेश वाजगे यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र वारूळवाडी येथे प्रातिनिधिक स्वरूपात या विमा पॉलिसी प्रमाणपत्राचे वाटप संतोष वाजगे, वारूळवाडीच्या उपसरपंच माया डोंगरे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जुन्नर तालुका अध्यक्ष सुरज वाजगे, माजी उपसरपंच जंगल कोल्हे, रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन घोडेकर, जनमंगल पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन वाळुंज, उपसरपंच महेश शेळके, लहू वायकर, शिवदत्त संते, गौतम औटी, हितेश को-हाळे, अनिल दिवटे, अभय वाव्हळ, जुबेर शेख, अजित वाजगे, डॉ.चैताली कान्गुने डॉ.माटे, डॉ.घोरपडे,
वैभव सहाने, गुंजकर आरोग्य केंद्राचे कर्मचारी परिचारिका व आशा वर्कर उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळात आशा वर्कर्स, रुग्णवाहिका चालक आणि गॅस शवदाहिनी कर्मचारी यांनी आपल्या जीविताचा धोका पत्करून रुग्णसेवा केलेली आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने विक्रांत पतसंस्थेने हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती संतोष वाजगे यांनी दिली.
या कोरोना कवच विमा पॉलिसी अंतर्गत आशा वर्कर आणि शवदाहिनी कर्मचारी यांना एक लाख रुपये व रुग्णवाहिका कर्मचारी यांना दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
या उपक्रमा सोबतच नारायणगाव ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर व इतर खाजगी कोविंड केंद्रांना बिसलेरी पाणी बॉक्सचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी विक्रांत पतसंस्थेचे पदाधिकारी,कर्मचारी,श्री गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस वाजगे यांनी केले तर आभार हर्षल वाजगे यांनी मानले.