गुंजाळवाडीत घरोघरी जाऊन कोविड लसीकरण
रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१३ जानेवरी २०२२
बेल्हे
गुंजाळवाडी (ता.जुन्नर) येथे बुधवार (दि.१२) रोजी रात्री ९ वाजेपर्यंत बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी गावातील कोणताही कोविड डोस न घेणाऱ्याच्या घरोघरी जाऊन लसीचा पहिला डोस दिला. जे राहिले होते किंवा काही लोक लस घेण्यासाठी नकार देत होते त्यांच्या घरी जाऊन लसीकरणाच महत्व सांगून लस देण्यात आली.
बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचा अनोखा उपक्रम
अशाप्रकारे नागरिकांना लसीच महत्त्व पटवून कडाक्याच्या थंडीत रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.गेल्या पाच-सहा दिवसांमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये भरमसाठ कोविड रुग्ण संख्या वाढली असल्याने आरोग्य विभागाने लसीकरणावर भर दिला आहे.न घाबरता जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ. शिवाजी फड यांनी केले आहे.