शिवनेरी किल्ल्यावर २० किलोमीटर हवाई अंतर लक्षात घेऊन विकास आराखडा बनवा – आमदार अतुल बेनके

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर 
१३ जानेवरी २०२२

बेल्हे


छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला परिसरातील २० किलोमीटर हवाई अंतर लक्षात घेऊन विकास आराखडा बनवण्याची सूचना जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. आराखडा करताना रस्ते, स्वच्छतागृहे, पार्किंग, वेटिंग शेड,बाग बगीचा आदी गोष्टींचा समावेश करण्याबाबत बेनके यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.रस्ते दर्जात्मक करणे व योजना बाह्य रस्ते योजनेत समाविष्ट करणे बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश तात्काळ कर्मचाऱ्यांना दिले.

सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे अधीक्षक अभियंता यांच्या दालनात नुकतीच स्वतंत्र बैठक संपन्न झाली. राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, शिवनेरी परिसर विकास, पूल, रस्ते दर्जा दर्जेदार करणे व योजना बाह्य रस्ते योजनेत समाविष्ट करणे आदी मागण्या बाबत आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.या वेळी सार्वजनिक विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता आर.वाय.पाटील,पुणे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार,शरद लेंडे, मोहित ढामाले, भाऊ देवाडे अरुण पारखे,प्रदिप पिंगट,गणपत कवडे, विकास दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

त्याचबरोबर कुकडी नदीवर जाधववाडी, निमगाव सावा दरम्यान मीना नदीवर हिवरे तर्फे नारायणगाव आणि पुष्पावती नदीवर पिंपळगाव येथे नवीन फुलाचे सर्वेक्षण करण्याचे तसेच मांदारने येथे गिर्यारोहक प्रशिक्षण केंद्र निर्माण करणे याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आमदार अतुल बेनके यांनी दिले. तसेच पुणे- नाशिक रेल्वे स्टेशन हिवरे तर्फे नारायणगाव येथे होणार असल्यामुळे नारायणगाव- खोडद-निमगाव सावा हा रस्ता ९ मीटर रुंदीचा करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *