मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून जिल्हा परिषद शाळेंनाही मिळणार मध्यभोजन

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०५ सप्टेंबर २०२२

घोडेगाव


आदिवासी मुलांच्या आश्रमशाळा व वसतीगृहांसाठी घोडेगाव येथे होत असलेले मध्यवर्ती स्वयंपाकगृह लवकरच सुरू होत असून यातून जिल्हा परिषद शाळेतील विद्याथ्र्यांना देखिल मध्यभोजन देता येवू शकते यासाठी गटविकास अधिकारी यांनी माहिती गोळा करावी अशा सुचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

घोडेगाव येथे असलेल्या चार जिल्हयांच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील विविध योजनांचा आढावा व चर्चा करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठक घेतली. याबैठकीस प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, जुन्नर, आंबेगाव, खेड व मावळचे गटविकास व गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते.


दहा हजार मुलांना एकावेळी जेवण देता येवू शकेल असे मध्यवर्ती स्वयंपाकगृह घोडेगाव जवळ कोटेमदरा येथे बांधून पुर्ण झाले आहे, हे लवकरच सुरू होणार आहे. यातून जिल्हा परिषदेतील विद्याथ्र्यांना मध्यभोजन देण्याचा विचार आहे. तसेच या मध्यवर्ती स्वयंपाकगृहासाठी जलजिवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा करण्याची योजना प्रस्तावित करावी. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना अतंर्गत समावेश असलेल्या पुणे जिल्हयातील 17 गावांचे प्रस्ताव आठ दिवसात गटविकास अधिकारी यांनी दयावेत. यामध्ये जुन्नर तालुक्यातील घाटघर व इंगळुन या गावांचा अराखडयात समावेश करावा अशा सुचना दिल्या.

पेसा क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या पाच ग्रामपंचायतींची नावे बिरसा मुंडा उत्कृष्ट ग्रामपंचायतसाठी आंबेगाव व जुन्नर गटविकास अधिकारी यांनी आठ दिवसात प्रकल्प अधिकारी यांना दयावेत. आदिम जमाती घरकुल योजने मधून 86 घरांचा लक्षांक शिल्लक आहे तसचे पारधी जमातीकरीता 2017-18 मधिल 28 घरांचा लक्षांक शिल्लक आहे यासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याच्या सुचना दिलया. ठक्करबाप्पा योजनेतंर्गत सुरू असलेली कामे लवकर पुर्ण करावीत, इंगळुन येथील छोटा सिमेंट बंधारा बांधण्याची वर्क आॅर्डर देण्यात आली असून हे काम लवकर सुरू करावे, तसेच भोर तालुक्यताील शासकिय आश्रमशाळा कुरूंजी व पांगारी या शाळांसाठी पाणीपुरवठा योजना मंजुर झाल्या आहेत. याच्या वर्क आॅर्डर देखिल झाल्या असून लवकर कामे सुरू करावीत. तसेच आंबेगाव मधिल गोहे व जुन्नर तालुक्यातील मुथाळणे या शाळा जलजिवन मिशन अंतर्गत गावासाठी होणा-या पाणी पुरवठा योजनेमधून जोडाव्यात. आयुष प्रसाद यांनी दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *