वाळू चोरी गुन्ह्यातील सराईत आरोपींना घोडेगाव पोलिसांनी ठोकल्या बेडया

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०४ फेब्रुवारी २०२२

घोडेगाव


घोडेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत सार्वजनिक मालमत्ता नुकसान अधिनियम कायदा १९८४ चे खनिज अधिनियम १९५७ सुधारणा सन २०१५ चे कलम ४, २१ कलमा नुसार दि.२३ डिसेंबर २०२१ रोजी गुन्हयातील सराईत तीन अरोपींना पोलिसांनी बेडया ठोकल्या आहे. घोडेगाव पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडुन माहिती काढून सराईत अरोपींना वडगाव काशिंबेग , साकोरे,ढाकाळे येथे पकडण्यात आले असल्याची माहिती घोडेगाव पोलिसांनी दिली.

अरोपी १ ) तुषार शांताराम टेके वय -२५ वर्ष रा. वडगाव काशीबेंग , ता. आंबेगाव .जि.पुणे २ ) वैभव बबन कडुसकर वय ४२ वर्ष रा. साकोरे ता. आंबेगाव जि. पुणे ,३ ) शिवाजी मारूती कुऱ्हाळ रा. जांबुत ता. संगमनेर.जि अहमदनगर अशी पकडण्यात आलेल्या तीन अरोपींची नावे आहे.

घोडेगाव पोलिस स्टेशनच्या दमदार कामगिरीचे होत आहे कौतुक

यातील सदर आरोपी तुषार शांताराम टेके यांच्यावर मंचर पोलीस स्टेशनला वाळूचोरी संदर्भात दोन गुन्हा तर घोडेगाव पोलीस स्टेशन येथे देखिल दोन गुन्हे दाखल आहे. तसेच वैभव बबन कडुसकर यांच्यावर मंचर पोलीस स्टेशन येथे दोन तर घोडेगाव पोलीस स्टेशन येथे तीन गुन्हे दाखल आहे यातील अरोपी वाळु चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आहे. अशा गुन्हेगारांना घोडेगाव पोलिसांनी पकडल्याने पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामिण दलाचे पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलिस स्टेशचे दबंग पोलिस अधिकारी साहायक पोलीस उपनिरीक्षक जीवन माने, पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण,किशोर वागज, पोलिस नाईक तेजस इष्टे,विठ्ठल वाघ, धोंडू मुठे निलेश तळपे अदि टिमने केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *