पिंपरी | भारत रत्न डॉ,बाबासाहेब यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली..

दिनांक – १५/०४/२०२४

भारत रत्न डॉ,बाबासाहेब यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली
जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जागायचं हे शिकवेल अशा विचारांची शिकवण देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक विद्यार्थ्याला घडण्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहेत बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला मिळावा व शिक्षणासाठी मदत करण्यासाठी रयत विद्यार्थी विचार मंच संस्था नेहमीच कटीबद्ध राहील – धम्मराज साळवे (संस्थापक अध्यक्ष ,रयत विद्यार्थी विचार मंच )

बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले.बाबासाहेबांनी महिलांचे समान हक्क, लोकसंख्या नियंत्रण, समान नागरी संहिता आणि मूलभूत जबाबदाऱ्या याविषयीही लोकांना जागृत केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने एक वही एक पेन संकलन व वृक्षारोपणा करिता रोप वाटप असा अनोखा उपक्रम राबवण्यात आला , रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे ,राज्य समन्वयक श्वेता धम्मराज साळवे ,प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या हस्ते भीमसृष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एक वही एक पेन संकलन व वृक्षारोपणा करिता रोप वाटप उपक्रमास सुरवात करण्यात आली सदर उपक्रमात अनेक मान्यवरांनी नागरिकांनी सहभाग दर्शवत संस्थेकडे वही पेन सुपूर्द करत अभिवादन केले तर या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना मान्यवरांना वृक्षारोपणा करिता रोप वाटप करत सन्मान करण्यात आला सदर उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी उपस्थिती लावून उपक्रमास सदिच्छा व्यक्त केल्या .

रयत विद्यार्थी विचार मंच संस्था दरवर्षी हा उपक्रम राबवत असते या उपक्रमाच्या माध्यमातून जमा होणारे शैक्षणिक साहित्य शहरातील गरीब गरजू विद्यार्थी तसेच इतर ठिकाणच्या आश्रम शाळा यांना हे साहित्य पुरवले जाते रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या माध्यमातून सूचना करर्ण्यात येते कि गरजू विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी वह्या व पेन याची आवश्यकता असल्यास संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे (संपर्क – ९६०४६८३४५९) यांना संपर्क साधावा .
सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे ,राज्य समन्वयक श्वेता धम्मराज साळवे ,प्रदेश महासचिव संतोष शिंदे , शहराध्यक्ष अभिषेक चक्रनारायण , भाग्यश्री आखाडे ,माधवी खरात ,योगेश कांबळे ,अजय चक्रनारायण, अतुल वाघमारे ,विक्रांत शेळके , अभिजित लगाडे ,प्रणाली कावरे , सिद्धार्थ सूर्यवंशी व इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *