शीर्षासनाचा विश्वविक्रमाला अक्षय शेटे याने घातली गवसणी

तेजस शेरकर
बातमी प्रतिनिधी
२८ सप्टेंबर २०२१

निवृतीनगर

१२० शीर्षासनाचे क्रंचेस करून एक नवा विश्वविक्रम स्थापन केला आहे

सोशल मीडियाच्या जमान्यात तरुणांचे आरोग्य ढसाळले असून तरुणांसाठी आरोग्याचा मैलाचा दगड बनून जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील मुंबई घाटकोपर येथे राहणाऱ्या एका आय टी इंजिनिअर यरुणाने वयाच्या २८ साव्या घेत एका मिनिटांमध्ये १२० शीर्षासनाचे क्रंचेस करून एक नवा विश्वविक्रम स्थापन केला आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील शिर्षासानाचे एका मिनिटांमध्ये ७२ क्रंचेसचा रेकॉर्ड मोडीत काढून नवा विश्वविक्रमाचा नवा अध्याय अक्षय शरद शेटे याने लिहिणारा तो देशातील पहिला युवक ठरला आहे.

घाटकोपर येथे असल्फा व्हिलेज मधील खन्ना अपार्टमेंट मध्ये राहत्या घरी त्याने हा विश्वविक्रम संपादन केला अक्षयचे वडील हे साकीनाका पोलीस ठाण्यात पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून सेवा करत असून आई माधवी(निर्मला)ही गृहिणी असून त्याचा छोटा भाऊ शुभम हा ऑस्ट्रेलिया आंतराष्ट्रीय दर्जाच्या जिममध्ये म्यानेजर पदावर आहे व एक बहीण रेणुका हिने फॅशन डिझाइन मध्ये डिग्री संपादन केली आहे अक्षयचे मामा हे जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक गावचे बिनविरोध सरपंच होते व मीडियामध्ये 20 वर्ष कार्यरत असून त्यांनी व नातेवाईक यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले.

तरुण पिढीपुढे एक नवा आदर्श

आयटी क्षेत्रात इंजिनियर असलेल्या या तरुणाने या विश्वविक्रमाद्वारे सध्याच्या तरुण पिढीपुढे एक नवा आदर्श ठेवला आहे म्हणूनच त्याच्या या रेकॉर्डची दखल घेत वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया ह्या संस्थेचे सीनियर एज्युकेटर सुषमा संजय नार्वेकर व संजय विलास नार्वेकर यांनी त्याला सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्याला गौरविले आहे अक्षय याने या विश्वविक्रमाला गवसणी घातल्याबद्दल राज्यातून व देशातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून जुन्नरचे आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर, माजी आमदार शरददादा सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य व भाजपा नेत्या आशाताई बुचके राज्याच्या गृह विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर किसन गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक विलास मडीगेरी, विविध सामाजिक संस्थांनी त्याचे केले आहे.

मुंबई येथे लक्ष फाउंडेशनचे चेअरमन राजुशेठ पाखरे,लॅपविंगचे चेअरमन विनोद जाधव साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख, मराठा क्रांती मोर्चाचे व्यासदेव पवार यांनी अक्षय व त्याचे आई वडिलांचा विशेष सन्मान केला यावेळी पोलीस खात्यातील पोलीस निरीक्षक बुधन सावंत, बहिरवाडे, वाघे, दगडे, चव्हाण,हॉटेल विंडचे मालक राजनजी,लक्ष्मण पिल्लाई, निलेश महाजन,प्रकाश शेट्टी, अमित साळुंखे, आदी मान्यवर उपस्थित होते.

शीर्षासनाचा विश्वविक्रमाला अक्षय शेटे याने घातली गवसणी
शीर्षासनाचा विश्वविक्रमाला अक्षय शेटे याने घातली गवसणी

“माझ्या या यशात माझे आई वडील व कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे” – अक्षय शेटे

आपला आवाजशी बोलताना अक्षय याने सांगितले की माझ्या या यशात माझे आई वडील व कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे मला लहानपणापासून कोणत्याही क्षेत्रात विश्वविक्रम करण्याचा इरादा होता त्यासाठी मी योग हे क्षेत्र निवडले योगामुळे बुद्धी शांत व विचारी राहते त्यामुळे माणसाची सर्वांगीण प्रगती होते अक्षय यास शुभेछ्या देताना विघ्नहरचे चेअरमन सत्यशील दादा म्हणाले की अक्षय हा खूप सोशल मीडियात ऍक्टिव्ह असून त्याद्वारे त्याच्या या विश्वविक्रमाचा फायदा आजच्या तरुण पिढीला निश्चित होईल निवृत्त पोलीस अधिकारी किसन गायकवाड अक्षयला शुभेछ्या देताना म्हणाले की माझ्या जिवलग मित्राच्या मुलाने हा विश्वविक्रम रचल्याने मला मनस्वी आनंद झाला असून माझ्या मित्रांची देखील मुलाच्या या पराक्रमामुळे राज्यातील पोलीस खात्यात मान उंचावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *