एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिक संघाचा पंधरावा वर्धापनदिन खासदार बारणे आमदार बनसोडे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवड
दि.05/03/2024

एम्पायर इस्टेट जेष्ठ नागरिक संघाचा १५ वा वर्धापन दिन रविवार दिनांक ३मार्च २०२४ रोजी सकाळी नऊ वाजता क्लबहाऊस 1 मध्ये संपन्न झाला. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, मनशक्ती केंद्र साधक डॉ.संजीवकुमार पाटील
यांचे स्वागत संघाचे अध्यक्ष श्री.रामदास माळी यांनी केले.दीपप्रज्वलन व गणेश पुजन करुन सोहळ्यास आरंभ झाला.

डॉ.संजीवकुमार पाटील, महासंसदरत्न खा.श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अण्णा बनसोडे या पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष रामदास माळी,सचिव ॲड.दिलीप पाटील, कार्याध्यक्ष संजय साळवी यांनी केला. जेष्ठ नागरिक महासंघ अध्यक्ष श्रीमती वृशालीताई मरळ यांचा सत्कार उपाध्यक्ष श्रीमती वंदना काळे, खजिनदार श्रीमती अर्चना नलावडे ,सौ.कविता ब्राह्मणगावकर यांनी केला. “उत्तरायण “या आपल्या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

संपादिका सौ.अस्मिता अशोकराव मोरे यांचा सत्कार करण्यात आला. खासदार श्रीरंग आप्पा बारणे व आमदार श्री.अण्णा बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संघास शुभेच्छा दिल्या. जेष्ठ नागरिक महासंघ अध्यक्ष श्रीमती वृशालीताई मरळ प्रमुख पाहुणे व मा.नगरसेवक प्रसाद शेट्टी, फेडरेशन अध्यक्ष श्री बाबूलाल चौधरी , उद्योजक बाबुराव सागांवकर व श्री.गिरीश शेट्टी उपस्थित होते.

संघाच्या खजिनदार श्रीमती अर्चना नलावडे यांची एम्पायर इस्टेट महिला मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जेष्ठ नागरिक महासंघ अध्यक्ष श्रीमती वृशालीताई मरळ यांनी सन्मानित केले.
७५ वर्षे सभासदांचे वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आले.यानंतर ज्या सभासदांच्या लग्नाला ५० वर्षे पुर्ण झालेत, त्यांचा लग्न सोहळा संपन्न झाला.सनई व मंगलाष्टकांच्या गजरात पुन्हा एकदा त्यांचे लग्न लावण्यात आले.

सभासदांचे या महिन्यातील वाढदिवस साजरे करण्यात आले. नविन सभासदांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
या वर्षांत जे सभासद दिवंगत झाले त्यांना आदरांजली वाहण्यात आली .
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुयश कुलकर्णी व आभार प्रदर्शन सौ.कविताब्रामहणगावकर यांनी केले.
फोटोग्राफी कार्यकारिणीचे श्री.विजय भोंडोकर यांनी केली आहे.
तसेच कार्यकारिणी तील इतर सर्व संचालक सुरेश व्यास, श्री.जयकुमार नारकर,श्री अशोक मोरे, विनोद म्हालसेकर, यतिन पारेख, सतीश पैठणकर, रमेश बाहेती, रामचरण राय,श्रीमती उमा पाटील यांनी अथक परिश्रमाने हा कार्यक्रम अतिशय थाटात साजरा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *