जुगार खेळणाऱ्या १२ जणांवर पोलिसांची कारवाई:- ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेल्हे दि.२७ (वार्ताहर:-विभागीय संपादक रामदास सांगळे):- आळे (ता. जुन्नर) येथील खापरवाडी शिवारातील कळमजाई माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वनखात्याच्या जागेत चालू असलेल्या जुगार अड्डायावर छापा टाकून आळेफाटा पोलिसांनी बारा जुगाऱ्यांना अटक करुन ६५ हजार ६० रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला.

याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एम.ए. पवार ठाणे अंमलदार एन.आर.कारखेले यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मारूती बबन गुंजाळ (वय ४०) रा आळे, ता. जुन्नर, उमेश मुक्ता गोफणे (वय ४५), दिनेश खंडू शिरतर (वय ३०), गजानन बाबूराव इंगोले (वय ३६) सर्व रा-आळे ता. जुन्नर, नसिर अहमद पठाण, (वय ३८) रा- घारगाव ता. संगमनेर जि. नगर, सुभाष ज्ञानदेव मुसळे , (वय ४०) रा.शुभम तारांगण, आळेफाटा,विश्वनाथ बबन फावडे (वय ४३) रा- बेल्हे, ता. जुन्नर रंगनाथ चिंतामण काळे , (वय ५०) रा. खोडद ता. जुन्नर, दत्तात्रय सदाशिव फापाळे, (वय ५०) रा- जाचकवाडी ता.संगमनेर, सुनिल बन्सी कुर्‍हाडे (वय ३४) रा- आगरमळा, आळे ता. जुन्नर, दिनेश पोपट गुंजाळ (वय ३०) रा- आळेफाटा ता. जुन्नर, महेश नानासाहेब शेळके (वय ३०) रा – शेळकेमळा, बोटा ता. संगमनेर. हे १२ जण खापरवाडी, आळे येथे पत्यांच्या पानावर पैसे लावून जुगार खेळताना मिळून आले.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जुगारांची रोख रक्कम ४१ हजार ८६० रु. तसेच मोबाईल व इतर साहित्य अशी एकूण ६५ हजार ६० रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपीच्या विरोधात गु.र.नं- ४४४/२०२० मु.जु. का. कलम १२ ( अ) अन्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत. पुणे ग्रामीणचे पो. निरीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पो.निरीक्षक विवेक पाटील, जुन्नर उपविभागीय पो. अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पो. स्टेशनचे पो.निरीक्षक एम.ए. पवार, पो. कॉ. अशोक फलके, हनुमंत ढोबळे, किशोर कुलकर्णी यांनी वरील कारवाई केली.आळेफाटा परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट असून पोलीसांच्या या कारवाईने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *