शिरूर तालुक्यातून ई १० वी बोर्ड परीक्षेस यंदा ५९२२ विद्यार्थी : अनिल बाबर, गट शिक्षणाधिकारी शिरूर

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे.
शिरूर : दि. ०१/०३/२०२४.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळामार्फत, ई १० वी च्या बोर्ड परीक्षा शुक्रवार दि. १ मार्च २०२४ पासून सुरू झाल्या असून, त्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एकूण ५९२२ विद्यार्थी बसलेले आहेत. त्यापैकी मुले २८३५ असुन , मुली ३०८७ आहेत.
शिरूर तालुक्यात एकूण १४ ठिकाणी परीक्षेची केंद्रे असुन, शालांत परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी पंचायत समिती शिरूरच्या गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी भरारी पथके नेमली असून, त्यात गटशिक्षण विस्ताराधिकारी वंदना शिंदे, बाळकृष्ण कळमकर, किसन खोडदे, लक्षण काळे व रघुनाथ पवार यांचा समावेश आहे. तसेच मुख्याध्यापक प्रतिनिधी म्हणून मारुती कदम व राजू ढवळे यांचाही या पथकात समावेश आहे.


त्याचप्रमाणे प्रत्त्येक केंद्रासाठी केंद्र प्रमुखाची बैठे पथक म्हणजेच स्थानिक पथक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूल (रयत) या शाळेत मुख्य कस्टडी (परिरक्षण केंद्र) असून, परीक्षेच्या १४ केंद्रांमध्ये सबकस्टडी आहेत.
मुख्य परिरक्षक म्हणून गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर हे काम पाहत असुन, उप परिरक्षक म्हणून जिजाबापू गट व श्रीकांत नीचीत यांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे.
तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असणारे केंद्र हे शिक्रापूर असून, येथे ८३७ विद्यार्थी परीक्षेस बसलेले आहेत. तर सर्वात लहान केंद्र केंदूर असून, येथे ११७ विद्यार्थी परीक्षेस बसलेले आहेत. याशिवाय शिरूर शहरातील रयत शाळेत ४७२, विद्याधाम प्रशालेत ५१३, न्हावरे ५२०, मलठण ४९२, कोरेगाव ३४९, जातेगाव ४१९, तळेगाव ५७७, वडगाव रासाई २५४, करडे ४६३, निमगाव म्हाळुंगी २८५, टाकळी हाजी ३४० व मांडवगण येथील केंद्रामध्ये २८४ विद्यार्थी परीक्षेला बसले असल्याची माहिती, शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी दिलीय.


शिरूर तालुक्यात यंदा ई. १० वी च्या बोर्ड परीक्षेस बसण्याचे प्रमाण हे मुलांपेक्षा मुलींचे अधिक असुन, मुलांपेक्षा २५२ मुली अधिक आहेत. तसेच राज्याच्या निकालातही मुलीच मोठ्या प्रमाणावर बाजी मारत असल्याचे चित्र आत्तापर्यंत दिसून आलेले आहे.
१ मार्च २०२४ रोजी बोर्ड परीक्षेच्या पहिल्या पेपरवेळी विद्याधाम प्रशाला येथे मुख्याध्यापक संजय शेळके, उपमुख्याध्यापक बी ए कोकाटे, पर्यवेक्षक गुरुदत्त पाचर्णे, शिक्षक पालक संघाचे रावसाहेब चक्रे, महावीर कोठारी आदींनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पेन व गुलाबपुष्प देऊन स्वागत करत परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. तर शिरूर शहर व तालुक्यातील अनेक विद्यालयांमध्ये परीक्षार्थिंचे स्वागत करत शुभेच्छा देण्यात आल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *