यमुनानगर सदगुरू उद्यान येथील नवीन विरंगुळा केंद्राला माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे- प्रा उत्तम केंदळे यांचे महापौर , पक्षनेत्यांना निवेदन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

निगडी- दि ३१ ऑगस्ट २०२१
मागील काही दिवसांपासून यमुनानगर येथील सदगुरू उद्यान येथे नवीन विरंगुळा केंद्राचे बांधकाम जलद गतीने सुरू आहे. ते आता पूर्णत्वाच्या दिशेने चाललेले असताना अश्यावेळी भारतीय जनता पार्टी यमुनानगर तर्फे त्या विरंगुळा केंद्राला माजी पंतप्रधान श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ह्यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. शहरात अद्याप तरी अटलजी ह्यांचे नाव कुठेही दिलेले नाही, त्यांचा आमच्या प्रभागातील या विरंगुळा केंद्राला नामकरण करून योग्य गौरव करावा ही आपणास मागणी केली. महापौरांनी व पक्षनेते यांनी सर्व साधारण सभेमध्ये हा नामकरणांचा ठराव मंजूर करून घ्यावा अशी मागणी केली .

यावेळी क्रीडा सभापती तथा नगरसेवक प्रा उत्तम केंदळे नगरसेविका कमलताई घोलप प्रभाग अध्यक्ष रंगनाथ पवार
युवा मोर्चा सचिव आदित्य कुलकर्णी
युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष गिरीष देशमुख
मंडल उपाध्यक्ष बाबा परब
मंडल सरचिटणीस रमाकांत पाटील
प्रभाग सरचिटणीस शेखर आसरकर
युवा मोर्चा मंडल अध्यक्ष शिरीष जेधे
युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रथमेश आंबेरकर,प्रज्ञावंत आघाडी शहर संयोजक दीपक काका कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष महिला सारिका चव्हाण, महिला अध्यक्ष विमल काळभोर, योगेश साळुंखे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *