Junnar | आमदार अतुल बेनके यांना पितृशोक… माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन…

आमदार अतुल बेनके यांना पितृशोक

माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन

नारायणगाव
जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके यांचे अल्पशा आजाराने आज रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सोमवार दिनांक १२ रोजी दुपारी चार वाजता हिवरे बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी होईल. अशी माहिती जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी अधिकृतरित्या दिली.
माजी आमदार वल्लभ शेठ बेनके हे 1985 साली प्रथम जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते त्यानंतर 1990 साली दुसऱ्यांदा ते आमदार झाले त्यानंतर लागोपाठ दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी त्यांचा सलग दोन वेळा पराभव केला मात्र 2004 व 2009 साली पुन्हा आमदार वल्लभ बेनके जुन्नर विधानसभेवर निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून वल्लभ शेठ बेनके यांचे नाव प्राधान्याने घेण्यात येते. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचा दरारा संपूर्ण पुणे जिल्ह्यात होता त्यांच्या जाण्याने निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार अतुल बेनके यांच्या कुटुंबावर मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या वतीने माजी आमदार वल्लभ शेठ दत्तात्रय बेनके यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *