पिंपरी : स्मिता वाल्हेकर हिला आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये दुहेरी सुवर्णपदक…

स्मिता वाल्हेकर हिला आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये दुहेरी सुवर्णपदक

पिंपरी, दि. 11 – तिसर्‍या वाको आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत भारत देशाच्या स्मिता वाल्हेकर हिने दोन प्रकार प्रथम क्रमांक मिळवित दुहेरी सुवर्णपदक जिंकले. स्पर्धेत जगभरातील 20 देशांतील 1 हजार 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला.

ही स्पर्धा 7 ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान दिल्ली येथील इंदिरा गांधी स्पोट्स कॉप्लेक्स येथे झाली. स्मिता वाल्हेकर हिने 70 किलोखालील वजनी गटात पॉईट फाईट व लाईट कॉन्टॅक्ट या दोन प्रकारामध्ये विजय मिळवीत सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच, मेघा गावडे हिने 55 किलोखालील वजनी गटात पॉइंट फाईट प्रमारात सुवर्ण पदक, पूजा वाल्हेकर हिने 60 किलो वजनी गटात फुल कॉन्टॅक्ट प्रकारामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच, आर्या अंबारे हिला रौप्यपदक, वैष्णवी टिजगे हिला कांस्यपदक, साईराज धुमाळ याला सुवर्णपदक, रुहान गुलाटी याला कांस्यपदक, यश वाल्हेकर कांस्यपदक मिळाले आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना घेऊन गेलेल्या स्मिता वाल्हेकर स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या प्रशिक्षिका सुप्रिया वाल्हेकर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केलेा.

या स्पर्धेसाठी सलग सहा महिने अथक परिश्रम करणार्‍या खेळाडूंचे देशाला पदक मिळवून दिले म्हणून आभार मानले. खेळाडूंसोबत मुख्य प्रशिक्षक इक्बाल शेख यांनी देखील खूप परिश्रम घेतले. स्पर्धेचे आयोजन दिल्ली किकबॉक्सिंग असोसिएशनने केले. स्पर्धेला वर्ल्ड किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रॉय बेकर, तांत्रिक कमिटीसचे अध्यक्ष रोमिओ डेसा, ततामी स्पोर्ट्स अध्यक्ष ब्रायन बेक, रिंग स्पोर्ट्सचे अध्यक्ष युरी, उपाध्यी सलीम कायकी, भारतीय फेडरेशनचे अध्यक्ष संतोषकुमार, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नीलेश शेलार व आंतरराष्ट्रीय कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *