नारायणगावला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता स्वतंत्र सब डिव्हीजन कार्यालय मंजूर करा :- जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.3/6/2021

नारायणगावला सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता स्वतंत्र सब डिव्हीजन कार्यालय मंजूर करा :- जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार

बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

बेल्हे :-
नारायणगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता (Sub Division) कार्यालय होण्यासाठीचा पत्रव्यवहार जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे नुकताच केला आहे.
जुन्नर तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) सब डिव्हिजन कार्यालय जुन्नर येथे आहे. जुन्नर तालुक्याची भौगोलिक रचना पाहता हे कार्यालय अपुरे पडत आहे. नवीन कार्यालय नारायणगाव येथे होणे अत्यंत महत्वाचे आहे. जुन्नर तालुक्यातील पश्‍चिम भागात आदिवासी भाग व डोंगराळ प्रदेश आहे. तालुक्यातील राज्य मार्ग लांबी ११२ किमी असून त्यांची संख्या ७ आहे. तसेच प्रमुख जिल्हा मार्ग संख्या १८ असून एकूण लांबी ३५० किलोमीटर आहे.दोन्ही मार्गाची एकूण लांबी ४६२ किमी आहे. आदिवासी विकास कार्यालय,शिवनेरी परिसर सुधारणा कार्यक्रम,महाराष्ट्र शासन अर्थ संकल्प,सामाजिक न्याय,अल्पसंख्याक,जिल्हा नियोजन मंडळ,नाबार्ड,ब वर्ग तीर्थक्षेत्र कार्यक्रम आदी अनेक विभागामार्फत कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर होतात.उपलब्ध कार्यालय व मनुष्यबळ पाहता सर्व कामांचा नियंत्रण व देखरेख ठेवणे अत्यंत अवघड पडते. याचा परिणाम त्यांच्या दर्जा वर देखील होऊ शकतो. कामांमध्ये संनियंत्रण ठेवणे व दर्जेदार कामे पूर्ण होणे यासाठी अजून मनुष्यबळाची आवश्यकता आहे.या कारणाने नारायणगाव येथे स्वतंत्र सब डिव्हीसन कार्यालय मंजूर करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य व जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *