लैंगिक शोषण करणा-या क्रिएटिव्ह अॅकेडमीच्या नौशाद शेख वर कठोर कारवाई करा – पिंपरी-चिंचवड सखल हिंन्दू बांधवांनी दिले आयुक्तांना निवेदन

लैंगिक शोषण करणा-या क्रिएटिव्ह अॅकेडमीच्या नौशाद शेख वर कठोर कारवाई करा

पिंपरी-चिंचवड सखल हिंन्दू बांधवांनी दिले आयुक्तांना निवेदन

पिंपरी-चिंचवड
दि.04/02/2024

रावेत येथील क्रिएटिव्ह ॲकेडमीचा संस्थाचालक नौशाद शेख याने संस्थेतील विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्या विरोधात पिंपरी-चिंचवडमधील सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांना सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आरोपी नौशाद शेख याचा पूर्व इतिहास पाहाता अनेक विद्यार्थींनी, महिला शोषित असल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याच्यावर काठोर कारवाई करावी आणि संबंधित शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकायदाय असल्याने तात्काळ बंद करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जागरण मंच, सकल हिंदू समाज मित्र संघटनांचे प्रतिनिधी तसेच भाजपा शहराध्यक्ष श्री. शंकर जगताप, विधान परिषद आमदार सौ. उमा खापरे, महिला शहराध्यक्षा सौ. सुजाता पालांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा प्रमुख श्री. अमित गोरखे, श्री. नितीन वाटकर, श्री. धनंजय गावडे, श्री. संतोष गायकवाड, श्री. सुमित हगवणे, श्री. महेश मराठे, ॲड. आशिष सोनवणे, श्री. संदीप जाधव, श्री. योगेश सासवडे, श्री. कुणाल साठे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *