रांजणगाव मधील MEPL कंपनीच्या कचरा डेपोला भिषण आग…

शिरुर , ( विभागीय संपादक,रवींद्र खुडे )

शिरूर तालुक्यातील रांजणगाव MIDC मधील, MEPL म्हणजेच महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीमुळे बाधित गावांना होणारा त्रास व होणारे प्रदूषण, या विषयावर आपला आवाज ने कालच LIVE बातमी केली होती. निमगाव भोगीच्या अनेक शेतकरी, ग्रामस्थ, आजी माजी सरपंच व पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. आणि दुसऱ्याच दिवशी येथे भीषण आग लागली आहे. त्यामुळे परिसरातील गावातील लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झालीय की, कंपनीचा हा काहीतरी छुपा डाव तर नाही ना ?
परंतु एक मात्र खरे की, या आगीचा आता प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा, शिवाय लोकांच्या नापीक बनलेल्या शेतीचा आर्थिक मोबदला त्यांना कंपनीने अश्वाशीत केल्याप्रमाणे द्यावा. तसेच होणारे प्रदूषण हे प्रदूषण नियामक मंडळाने तपासावे. अशा अनेक मागण्या, आता बाधित शेतकरी जोरदारपणे करू लागले आहेत.


या कंपनीमध्ये राज्यातील अनेक शहरातून व कंपन्यांमधून येणारा घातक इंडस्ट्रियल कचरा, (HAZARD DUST) रस्त्यावरून धोकादायकरित्या रांजणगाव येथे वाहून आणला जातो. प्रक्रिया करण्याच्या नावाखाली येथे जमिनीत घेतलेल्या खड्डयांमध्ये गाडला जातो. यावर मातीचा थर दिला जातो.
कंपनीने तयार केलेल्या अशाच भयंकर अशा मोठ्या कचरा डेपोला रविवार दि ७ मार्च रोजी आग लागली आहे.