लाक्षणिक उपोषणाच्या पावित्र्यात असलेल्या मारुती भापकर यांना आज सकाळीच पोलिसांनी घेतले ताब्यात

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१४ जून २०२२

चिंचवड


मा‌‌. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रेल्वे लगतच्या विस्थापित होणारया झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाची जबाबदारी राज्यसरकार, स्थानिक स्वराज्य संस्था बरोबर आपल्या केंद्रसरकारने घेण्याबाबत १४जुन२०२२ रोजी श्री क्षेत्र देहू येथे होणा-या एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे मारुती भापकर यांनी सांगितले होते. पण पोलिसांनी आज (मंगळवार दि १४) रोजी सकाळी ७ वाजताच ताब्यात घेतले. भापकर यांनी पोलीस स्टेशनमध्येच लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

महाराष्ट्रातील महान संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र व क्रांतिकारी नगरी श्रीक्षेत्र देहू येथे आपण दि.१४जुन रोजी येत आहात‌. या नगरीत शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आपल्या शुभहस्ते होत आहे. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आपले या पुण्यनगरी मध्ये मनापासून स्वागत व अभिनंदन. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र क्रांतिकारी अभंग गाथा त्यावेळच्या समाजकंटकांनी पवित्र इंद्रायणी नदीमध्ये महाराजांना स्वतःच्या हाताने बुडवण्यात जबरदस्तीने प्रवृत्त केले होते. त्यानंतर संत तुकाराम महाराज यांनी त्याच ठिकाणी एका दगडाच्या शिळेवर १३दिवस बसून अन्नपाण्याचा त्याग करून अनुष्ठान मांडले. भगवंताच्या कृपेने १३व्या दिवशी महाराजांची अभंगगाथा दगडासह इंद्रायणी नदीतून वर आली. त्यानंतर महाराजांनी आपले अनुष्ठान सोडले. महाराजांनी ज्या शिळेवर बसून हे तेरा दिवसाचे आंदोलन केले.

महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्याच शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण श्री क्षेत्र देहू नगरीत येत आहात.याचा आम्हाला मनस्वी आनंदच आहे. जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले!! साधु तोची ओळखावा! देव तेथेची जाणावा!! संत तुकाराम महाराजांच्या याच गाथेतील प्रमाणानुसार आपण प्रधानमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सबका साथ,सबका विकास या नाऱ्या बरोबर देशातील गोरगरीब वंचित घटकांना सन२०२४ पर्यंत सगळ्यांसाठी घरे हि घोषणा केली होती. मा‌.सर्वोच्च न्यायालयाच्या एस.एस.पी.(सिविल) डायरी नंबर१९७१४/२०२१दि.१७/१२/२०२१च्या निर्णयानुसार भारतीय रेल्वे लगतच्या पन्नास-साठ वर्षापासून वास्तव्य करत असलेल्या कायदेशीर घोषित लाखो झोपडपट्टीवासींवर रेल्वे प्रशासन कारवाई करत आहे. या कारवाईमुळे गोरगरीब वंचित लाखो लोक विस्थापित होऊन त्यांना घरांपासून वंचित व्हावे लागणार आहे. याबाबत आपल्याशी व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्रीमहोदयाशी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यावर आपण व आपल्या मंत्रीमहोदयांनी आमच्या पत्राची कुठलीही दखल घेतली नाही. मंत्री महोदयांना भेटण्याचा प्रयत्न आम्ही केला असता‌. त्यांच्या उत्तरानुसार ते या कारवाईवर ठाम आहेत. असे दिसते.

उपकारासाठी बोलो हे उपाय! येणे विन काय आम्हा चाड!! बुडते हे जन न देखवे डोळा! येतो कळवळा म्हणोनिया!! रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणे मुंबईसह संपूर्ण देशभरातील कोट्यावधी गोरगरीब वंचित घटक आपल्या घरापासून वंचित होऊन त्यांच्या बाल बच्च्यांच्या डोक्यावरील छप्पर कायमस्वरूपी जाणार आहे. त्यामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांच्या झोपा उडालेल्या असून ते भयभीत आहेत. सत्य असत्याशी मन केले ग्वाही! मानइले नाही बहुमता!! आपण २०२४ पर्यंत सर्वांसाठी घरे हे आश्वासन जनतेला दिले. मात्र सर्वांसाठी घरे राहिले बाजूला स्वकष्टाने गोरगरिबांनी उभे केलेली कोट्यावधि लोकांचे घरे या निर्णयामुळे जाऊन ते विस्थापित होणार आहे. खरे तर या कायदेशीर घोषित झोपडपट्ट्या या विस्थापित झोपडपट्टीवाशियांची पर्यायी व्यवस्था पुनर्वसना शिवाय अशी कारवाई करता येत नाही अशे प्रचलित कायदे आहे‌. मात्र या कायद्याला फाट्यावर मारू रेल्वे प्रशासन आडमुठी भूमिका घेऊन लोकांना भयभीत करत आहे. या कारवाईच्या टांगत्या तलवारीमुळे लोकांचे शारीरिक-मानसिक आर्थिक नुकसान होत आहे. खरे तर या विस्थापित होणाऱ्या झोपडपट्टयांचे पुनर्वसनाबाबत राज्यसरकार,स्थानिक स्वराज्य संस्था बरोबरच केंद्र सरकारची देखील कायदेशीर व घटनात्मक जबाबदारी आहे. मात्र केंद्र सरकार हात वरकरुन हि कायदेशीर जबाबदारी झटकून या गोरगरीबांवर कारवाई करत आहे.

तुका म्हणे सत्य सांगे!येवोत रागे येतील ते!! कोट्यावधी गोरगरीब नागरिकांच्या या जटिल कायदेशीर अडचणीतुन मार्ग काढण्याकरता आपण स्वतः हा याप्रकरणी लक्ष घालून यशस्वी मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा तसेच राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था व केंद्र सरकारने संयुक्तरीत्या या विस्थापितांची पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारावी या मागणीसाठी व लोकांच्या प्रश्नाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी मी इच्छा नसताना १४जुन रोजी आपल्या कार्यक्रमाला कुठलाही अडथळा न आणता सनदशीर, अहिंसात्मक,शांततेच्या, घटनात्मक मार्गाने सकाळी ८.००सांय ५.००यावेळेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण श्रीक्षेत्र देहू नगरी या ठिकाणे करण्याचे ठरवले होते पण त्यागोदरच त्यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *