अश्वमेघ युवा मंच यांच्याकडून गरिब कुटुंबाला मदतीचा हात

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०९ जुलै २०२२

नारायणगाव


परिटवाडी(ओझर) तालुका जुन्नर येथील गणेश सुरेश फुलमाळी हे मुंबई येथील जे.जे रुग्णालयात लिव्हर ब्लॉकेज असल्याने उपचार घेत आहेत.कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्याने नंदकरवाडी(परिटवाडी) अश्वमेघ युवा मंच चे शाखा अध्यक्ष साहेबराव काकडे यांनी विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व अश्वमेघ युवा मंचचे संस्थापक गणेशभाऊ कवडे यांची भेट घेऊन मदत मागितली.व याच वेळी अश्वमेघ युवा मंचच्या जुन्नर शाखेचे अध्यक्ष प्रसाद रोकडे यांचा वाढदिवसदेखील होता.गणेशभाऊंनी प्रसंगावधान पाहून वाढदिवसासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून, वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करून व इतर सर्व रक्कम गणेश फुलमाळी यांच्या कुटुंबाकडे रोख स्वरूपात देऊन मदत केली. व अजुनही काही मदत लागल्यास मी व सर्व अश्वमेघ परिवार आपल्या सोबत आहे असे गणेशभाऊंनी संबंधित कुटुंबाला सांगत आधार दिला.या वेळी ही मदत कुटुंबाला लाख मोलाची होती.संपूर्ण कुटुंब यावेळी भावूक झाले होते.यावेळी या कुटुंबाने गणेशभाऊ कवडे व अश्वमेघ युवा मंच परिवाराचे आभार व्यक्त केले.

अश्वमेध युवा मंचचे अध्यक्ष गणेश कवडे यांचा उपक्रम

यावेळी अश्वमेघ युवा मंचचे संस्थापक गणेशभाऊ कवडे,उपाध्यक्ष योगेश शिंदे,परिटवाडी अश्वमेघचे अध्यक्ष व धालेवाडीचे उप सरपंच सुभाष दळवी,जुन्नर शहराचे अध्यक्ष प्रसाद रोकडे,सदस्य विजय जोशी.अश्वमेघ युवा मंच नंदकरवाडीचे अध्यक्ष साहेबराव काकडे,साहेबराव फुलमाळी,प्रसाद बनकर,करण शिंदे,आशीर्वाद गाडेकर,अथर्व जुंदरे,जयेश जोशी हे उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *