ठाकरे की शिंदे खरी शिवसेना कुणाची?; पुढील वर्षी होणार सुनावणी

१२ डिसेंबर २०२२


केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज शिवसेना पक्षासंदर्भात महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आयोगासमोर उपस्थिती लावली. आज ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांकडूनही जबरदस्त युक्तिवाद होण्याची चिन्ह होती, मात्र आज फक्त पाच ते सात मिनिटं हे प्रकरण आयोगासमोर चाललं. मुख्य याचिकेच्या अनुषंगाने इतर दोन ते तीन अर्ज आल्याने यासंदर्भातील सविस्तर सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला. शिवसेना नेते अनिल देसाई यांनी ही माहिती दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *