अतुल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर शहर क्रीडा अध्यक्षपदी नियुक्ती

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट), ॲड स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे यांनी, या विभागाच्या शिरूर शहर अध्यक्षपदी नुकतीच अतुल राजू गव्हाणे यांची निवड केली आहे.
अतुल गव्हाणे हे क्रीडा क्षेत्रात सक्रिय असून स्वतः पैलवान आहेत. याशिवाय शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे नाव सुचविल्याने, अखेर त्यांची या पदावर नियुक्ती झाल्याचे पत्र, क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय खेळाडू ॲड स्वप्नील ढमढेरे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेय.


शिरूर शहरात त्यांच्या नियुक्तीचे पत्र देताना, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार, रंजन झांबरे, त्याचप्रमाणे भाऊसाहेब जाधव, शुभम गव्हाणे, अविनाश मोरे, दीपक गजरे, विकी जाधव, अमोल वायकर, सलमान शेख, अनिकेत भिसे, सुरेश सूरवसे, बाला भोसले, सुरेश चव्हाण, ओंकार जगताप तसेच अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
“या पदावर नियुक्ती झाल्याने मला मनस्वी आनंद होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, तसेच क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा उपाध्यक्ष व शहराध्यक्षांनी माझ्यावर जी महत्त्वाची जबाबदारी सोपविलेली आहे, तिचा स्वीकार करून या पदाला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे.” अशी प्रतिक्रिया अतुल गव्हाणे यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी संवाद साधताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *