राज्याचे गृहंमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव व मंचर पोलिस ठाण्यासाठी नवीन इमारती मंजूर…

आंबेगाव : –
ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पोलीस स्टेशनसाठी स्वतंत्र आणि स्वतःच्या मालकीची इमारत  तसेच घोडेगाव आणि मंचर येथे पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यासाठी  एकूण ४० कोटी ३८ लाख इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी ८ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे.
              अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्याचे गृहंमंत्री दिलीपराव  वळसे पाटील यांच्या प्रयत्नामुळे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव व मंचर पोलिस ठाण्यासाठी नवीन इमारती मंजूर झाल्या आहेत.

मंचर पोलीस स्टेशन हे गेल्या काही वर्षापासून भाडेतत्वावर असलेल्या इमारतीत होते. आता या पोलीस स्टेशनला हक्काची इमारत मिळणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी शासनामार्फत ११ कोटी ५१ लाख इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या बांधकामाची बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल.

पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानाची सद्यस्थिती लक्षात घेऊन मंचर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरीता निवासस्थाने बांधण्यासाठी अनुक्रमे १४ कोटी ८१ लक्ष तर घोडेगाव येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी इमारतींचे बांधकाम करण्यासाठी १४ कोटी ६ लक्ष इतक्या रकमेच्या
या कामांसाठी सध्या ८ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून वरील तीनही कामे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच केली जाणार आहेत. बांधकामाचा नमुना नकाशा, मांडणी आणि विस्तृत नकाशा यांची वास्तुशास्त्र तज्ज्ञाकडून मंजुरी घेऊनच काम सुरु केले जाणार आहे.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *