मा. आमदार कै. बाबुराव दौंडकर स्मारक रांजणगाव, येथे पशुचिकीत्सा व दुग्धप्रक्रीया प्रशिक्षण संपन्न : ॲड धर्मेंद्र खांडरे, अध्यक्ष

माजी आमदार कै. बाबुराव दौंडकर स्मारक समिती, रांजणगाव आयोजित व क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, यांचे सहकार्याने दि. २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी, पशुतपासणी, दुग्धप्रक्रिया प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.
यावेळी पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ चे असोसीएट डीन डॅा. मिलिंद मेश्राम व त्यांच्या तज्ञ डॅाक्टरांनी शिरुर तालुक्यातील वेगवेगळ्या ७ गावातील शेतकऱ्यांना भेटून, त्यांच्याकडील गोठ्यातील पशुंची तपासणी करुन शेतकऱ्यांना दुग्धवाढीसाठी मार्गदर्शन केले. तसेच दुधापासुन वेगवेगळे दुग्धजन्य पदार्थ कसे तयार करायचे, याचेही प्रात्यक्षिक संस्थेच्या आवारात करुन दाखविण्यात आले. तसेच दुग्ध व्यवसायातील सरकारी योजनांची माहिती, जिल्हा खादी ग्रामोद्योगचे अधिकारी सतिष खरात यांनी दिली.


यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना समितीचे अध्यक्ष ॲड. घर्मेंद्र खांडरे यांनी सांगितले की, “या पुढील काळातही वेळोवेळी आढावा घेऊन दुग्धवाढीसाठी समितीतर्फे प्रयत्न केले जातील व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात येईल ”
कार्यक्रम प्रमुख दत्ताभाऊ दरेकर यांनी या शिबीरात एकुण १०५ शेतकऱ्यांकडील १००० जनावारांची प्रत्यक्ष गोठ्यावर जाऊन निरीक्षण व तपासणी केल्याचे सांगितले. यावेळी संभाजी गवारे, रविंद्र रबडे, धनंजय गायकवाड, सागर फराटे, नारायण शिंदे, तानाजी राऊत, बाळासाहेब पुंडे आदी मान्यवर ऊपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विठ्ठल वाघ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *