अखेर लाचखोर सहायक वन संरक्षक अधिकाऱ्याला न्यायलयाने सुनावली 1 दिवसाची पोलिस कोठडी…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.4/7/2021

अखेर लाचखोर सहायक वन संरक्षक अधिकाऱ्याला न्यायलयाने सुनावली 1 दिवसाची पोलिस कोठडी

बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

आळेफाटा: अहमदनगर लाचलुचपत विभागाची आळे फाटा येथे शनिवारी रात्री मोठी कारवाई करत संगमनेर तालुक्यातील श्रेणी 1 दर्जाचा वनखात्याचा सहायक वन संरक्षण अधिकारी विशाल किसन बोऱ्हाडे (वय:-40) लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला.आळेफाटा (ता.जुन्नर) येथील विजय कुऱ्हाडे या तक्रारदाराने तक्रार केली होती.लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 कलम 7 अन्वये संगमनेर पोलिसस्टेशन येथे शनिवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.


या बाबत सविस्तर माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील डोळासने गावातील जमिनीचे निर्वाणीकरण कसे केव्हा झाले असा विषयी जिल्हाधिकारी अ नगर यांनी अहवाल संगमनेर उपविभागिय अधिकारी विशाल बोऱ्हाडे यांचेकडे मागितलेला असताना अहवाल देण्यासाठी अर्जदार विजय रामचंद्र कुऱ्हाडे यांचेकडे 1 लाख रूपयांची मागणी केली होती, सदरचा गंभिर प्रकार आळे गावचे उपसरपंच विजय भिका कुऱ्हाडे यांना समजला व मदत व्हावी म्हणून राज्याचे वनराज्यमंत्री ना दत्तामामा भरणे यांना कुऱ्हाडे यांनी सांगितला व नाशिक दौऱ्यावर असताना नामदार दत्तामामा भरणे यांनी स्विय्य सहाय्यकाद्वारे रेंगाळलेले काम वेळेत पुर्ण करण्याचे व सुस्पष्ट अहवाल देण्याचे आदेश दिलेले असताना

Advertise

ते डावलून विशाल बोऱ्हाडे या वर्ग 1 च्या अधाकाऱ्याने तरीही मागणी कायम ठेवली व शनिवारी संगमनेरला बोलवून घेतले व संगमनेर हून मी पुण्याला जाणार आहे व मला आळेफाटा येथे पैसे द्या, असे सांगितले, किमान 40 हजार आता द्या असे सांगीतले , मग मात्र अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेशी विजय भिका कुऱ्हाडे यांनी संपर्क साधला व तात्काळ टीम आळेफाटा येथे दाखल झाली.संगमनेर ला जावून सगळी खात्री झाली व आळेफाटा येथे आरोपी आल्यानंतर पैसे स्विकारले.पथकामे सापळा रचून पैसे स्विकारल्या नंतर कारवाई करून तात्काळ पंचनामा करून अरोपी विशाल बोऱ्हाडे याला अटक केली, व संगमनेर येथे नेवून गुन्हा दाखल केला आहे.
आज (दि.4) रोजी संगमनेर न्यायलयाने 1 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *