तेलाचे डबे चोरी करून विकणारे दोघे जेरबंद, आळेफाटा पोलिसांची कारवाई…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.23/5/2021

तेलाचे डबे चोरी करून विकणारे दोघे जेरबंद, आळेफाटा पोलिसांची कारवाई

बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

संतवाडीतील किराणा दुकानातून तेलाचे डबे चोरून चाळकवाडीत विकणारे दोन तरुण आळेफाटा पोलिसांणी जेरबंद केले आहेत.तशी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार आळे (ता.जुन्नर) येथील संतवाडी वस्तीवर ज्ञानेश्वर सावळेराम पाडेकर यांचे किराणा गोडावुन असुन (दि.१५) रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी गोडाऊन च्या शटरचे लाॅक तोडुन आतमध्ये प्रवेश करून आत मध्ये असलेले खाद्य तेलाचे डबे चोरून नेले होते. याबाबत ची तक्रार ज्ञानेश्वर पाडेकर यांणी आळेफाटा पोलिस स्टेशन मध्ये नोंदवली होती.त्यानुसार या चोरीचा तपास चालु असताणा गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोरी गेलेले तेलाच्या डब्यांची विक्री चाळकवाडी (ता.जुन्नर) या ठिकाणी आरोपी करत आहे .अशी माहिती मिळताच पोलीसांणी सिध्देश तान्हाजी निघोट (आळे, ता.जुन्नर ) व विकास चांगदेव सोनवणे (चाळकवाडी ता.जुन्नर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला असुन आम्ही इतर दोन साथीदारांच्या सहाय्याने तेलाच्या डब्यांची चोरी केल्याचे सांगितले.पोलीसांणी या दोन्हीही आरोपींना अटक केली असुन चोरीला गेलेल्या मालापैकी तेलाचे डब्बे व विकलेल्या डब्यांचे पैसे हस्तगत केले आहे.या चोरीचा तपास पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकास लोंढे,लहानु बांगर,नरेंद्र गायकवाड, प्रदिप गर्जे,संजय शिंगाडे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *