रोहित खर्गे
विभागीय संपादक
निगडी -दि २४ एप्रिल २०२१
स्टुडंट्स एज्युकेशन सोसायटी, नेवाळे वस्ती, चिखली या संस्थेच्या वतीने उद्या रविवार दिनांक २५ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक प्रा. विजय सोनावले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यावेळी रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यास कोरोना काळात उपयोगी असणारे वाफेचे भांडे तसेच मास्क विनामुल्य भेट दिले जाणार आहे. या रक्तदान शिबिराचे आयोजन पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.
कोरोनासारख्या महामारीच्या काळात देशात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा पडू लागला असून अनेक रुग्णांचे प्राण धोक्यात आले आहे. यासाठी ‘कोरोना महामारीमध्ये रक्तदान करु या ! आपण सारे एक एकत्र होवून मानवास जीवदान देवू या!’ हे ब्रिदवाक्य घेवून हे शिबिर संपन्न होत असल्याचे प्रा. सोनावले यांनी सांगितले.
उद्या रविवार दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्टुडंटस् अॅकाडमी, नेवाळी वस्ती, घरकुल मार्केट जवळ या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याला पवना समाचार वृत्तपत्र व आपला आवाज न्यूज चॅनल यांच्या सहकार्याने होणार आहे.
तरी पिंपरी चिंचवड शहरातील इच्छूक रक्तदात्यांनी आपले कर्तव्य समजून रक्तदान करण्याचे आवाहन प्रा. विजय सोनावले यांनी केले आहे.