शिरूर | रोहित पवारांच्या ईडी चौकशीचा शिरूर राष्ट्रवादीकडून निषेध : तहसीलदारांना निवेदन : आंदोलनाचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची दिल्ली येथे आज दि. २४ जानेवारी २०२४ रोजी ई डी चौकशी चालू आहे. या कारवाईच्या निषेधार्थ शिरूर राष्ट्रवादी कडून तहसीलदा बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्फत शासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आलेय. या निवेदनात असे म्हटले आहे की, “राजकीय द्वेशापोटी राज्य सरकार आमदार रोहित पवार यांच्यावर ही कारवाई करत असून, राज्य सरकारच्या या प्रवृत्तीच्या विरोधात शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करत आहोत. तरी सदरची कारवाई सरकारने त्वरित थांबवावी, अन्यथा शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
यावेळी तुषार दसगुडे, निलेश पवार, संगीता शेवाळे यांनी मनोगतातून तीव्र शब्दांत सरकारचा निषेध करत, सरकार विरोधी व आमदार रोहित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुकाध्यक्ष तुषार दसगुडे, शहर युवकाध्यक्ष अमित शिर्के, तालुका युवक कार्याध्यक्ष गणेश शेळके, तालुका युवती अध्यक्षा संगीता शेळके, शहर महिला अध्यक्षा डॉ स्मिता कवाद, शहर युवती अध्यक्षा गीताराणी आढाव, युवक जिल्हा उपाध्यक्ष निलेश पवार व अर्षद शेख, शहर कार्याध्यक्ष हाफिज बागवान, शहर विद्यार्थी उपाध्यक्ष आदित्य उबाळे, लीगल सेल शहाराध्यक्ष ॲड रवींद्र खांडरे, माजी युवक जिल्हाउपाध्यक्ष योगेश पवार, युवक शहर उपाध्यक्ष गणेश जाधव, परवेझ शेख, राणी कर्डिले, अनिल गायकवाड व सोशल मीडिया कार्याध्यक्ष रोशन बाफना आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *