संक्रांतीनिमित्त नारायणगाव महाविद्यालयात तिळगूळ वाटप व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन..

संक्रांतीनिमित्त नारायणगाव महाविद्यालयात तिळगूळ वाटप व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

नारायणगाव – (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव, येथे वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र आयोजित मकरसंक्रांतीनिमित्त तिळगूळ वाटप व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव कांदळीच्या लोकनियुक्त सरपंच डॉ. पल्लवी भोर व वारूळवाडीच्या उपसरपंच ज्योती संते उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी , उपप्राचार्य प्रा. जी. बी होले, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. डी. टाकळकर, संशोधन केंद्रप्रमुख डॉ. जे. पी. भोसले, व्यवसाय प्रशासन प्रमुख डॉ. अनुराधा घुमटकर , प्राध्यापक आकाश कांबळे , डॉ. श्रीकांत फुलसुंदर , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. समीर शेख, भूगोल विभाग प्रमुख डॉ. शरद काफले, रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील कांबळे व इतर प्राध्यापक उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनुराधा घुमटकर यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमपर शुभेच्छा दिल्या. डॉक्टर पल्लवी भोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्कृती जपली पाहिजे असा संदेश दिला व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ज्योती संते यांनी महिलांचा सन्मान हा नारीशक्तीचा विजय आहे असा संदेश दिला.
यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले. विविध प्रकारच्या कविता, चारोळ्या, उखाणे इत्यादी सादर केले. तसेच काही प्राध्यापकांनीही काव्यवाचन, उखाणे, गीत गायन यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
डॉ. व्ही.टी पाटे व डॉ.ए. ए जगदाळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ.व्ही.एस. मोढवे, डॉ. एस.ए. जगदाळे, प्रा. पी. व्ही. आवटे व प्रा. टी. पी. वाघ यांनी केले तर डॉ. मधुरा काळभोर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *