भाजपची अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार; ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१७ ऑक्टोबर २०२२


भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. भाजपाच्या निर्णयानंतर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या उमेदवार ऋुतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.आहे.

ऋतुजा लटके म्हणाल्या, मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. सर्व पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून जी पत्र गेली. त्यांनी जी माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल आणि त्यांचं प्रत्येकाशी असलेलं सहकार्याचं नातं. प्रत्येकजण म्हणत होतं की माझे सहकारी होते. माझ्या बरोबर होते. त्या कामाची पावती आणि त्यांच्याबरोबर असलेल्या संबंधामुळे आज मला हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे त्यामुळे प्रत्येकाचे मी आभार मानते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *