पुणे काँग्रेसकडून लोकसभेसाठीच बिबुल वाजलं पुणे लोकसभेसाठी कॉँग्रेसकडून 20 जण इच्छुक : प्रदेश पदाधिकारी ते शहराध्यक्षांचा समावेश..

पुणे काँग्रेसकडून लोकसभेसाठीच बिबुल वाजलं पुणे लोकसभेसाठी कॉँग्रेसकडून 20 जण इच्छुक : प्रदेश पदाधिकारी ते शहराध्यक्षांचा समावेश..

पुणे लोकसभा निवडणुकीसाठीची काँग्रेसमधील 20 इच्छुकांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. इच्छुकांमध्ये आमदार रवींद धंगेकर माजी आमदार ( मोहन जोशी ), माजी मंत्री (बाळासाहेब शिवरकर), कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते (गोपाळदादा तिवारी) माजी आमदार (अनंत गाडगीळ), (दीप्ती चवधरी), महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या उपाध्यक्षा (संगीता तिवारी) व शहराध्यक्ष (अरविंद शिंदे) यांचाही समावेश आहे.

(पुणे लोकसभेसाठी काँग्रेसचे २० उमेदवार इच्छुक आहेत)

आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. भाजपाकडून जोरदार तयारी सुरू असताना महाविकास आघाडीच्या बैठकांचेही  सत्र सुरू आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ समन्वयकपदाची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शहर काँग्रेसने हे आदेश पारित केले होते. पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटप झाले नसले, तरी परंपरेनुसार ही जागा काँग्रेसकडे आहे. त्यानुसार काँग्रेसने या जागेवर  पहिल्यापासूनच दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे दिसत आहे.
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले असून, 20 जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला धूळ चारणाऱया रवींद्र धंगेकर यांचाही इच्छुकांमध्ये समावेश असल्याचे दिसत आहे. याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, ऍड. (अभय छाजेड)(सरचिटणीस,म.प्र.कॉ.क.)  , (संजय बालगुडे), (आबा बागूल) (माजी उपमहापौर),( दत्ता बहिरट ), (गोपाळ तिवारी)(वीरेंद्र किराड), (संगीत तिवारी) , (नरेंद्र व्यवहारे), (यशराज पारखी), (मुकेश धिवार), (राजू नागेंद्र कांबळे), (मनोज पवार), (संग्राम खोपडे) (आर. जे.) , (दिग्विजय जेधे) आदींनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
अविनाश बागवे यांचा अर्ज थेट प्रदेशाध्यक्षांकडे?
दरम्यान, या २० जणांमध्ये माजी शहराध्यक्ष (रमेश बागवे) किंवा माजी नगरसेवक (अविनाश बागवे) यांचा समावेश नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, अविनाश बागवे हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, त्यांनी काँग्रेस भवनला अर्ज न भरता आपला अर्ज थेट प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे. यावर आता प्रदेश कुणाला उमेदवारी देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *