आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रसारमाध्यमांवर विश्वासार्हता निर्माण करण्याची जबाबदारी – निलेश खरे

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रसारमाध्यमांवर विश्वासार्हता निर्माण करण्याची जबाबदारी – निलेश खरे

पीसीईटी – झी मीडिया यांच्या मध्ये सामंजस्य करार
पिंपरी, पुणे (दि. ०९ जानेवारी २०२४) विज्ञान, तंत्रज्ञानामध्ये जसा बदल झाला त्याचा फायदा सर्वच क्षेत्राला होत आहे. प्रसार माध्यमे ही त्याला अपवाद नाहीत. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रसार माध्यमांवर विश्वासार्हता निर्माण करण्याची जबाबदारी आहे. कारण डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फेक बातम्या किंवा अन्य माहिती प्रसारित करण्याचा धोका असतो. यासाठी माध्यमांनी अधिक सजक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन झी २४ तास चे संपादक निलेश खरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि झी मीडिया यांच्यामध्ये सोमवारी (दि.८ जानेवारी) पीसीयुच्या साते मावळ येथील मुख्यालयात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ राजीव भारद्वाज आदी उपस्थित होते.
या सामंजस्य करारामुळे पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या मास मीडिया कम्युनिकेशन कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रोग्रॅम, संशोधन कार्यक्रम, विविध कार्यशाळा यांसाठी सहकार्य आणि परस्पर ज्ञानाची देवाणघेवाण यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी झी मीडिया तर्फे व्याखाने, माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. पत्रकारिता, मासमीडिया, अ‍ॅनीमेशन आणि व्हीएफएक्स, मल्टीमीडिया डिझाइन, व्यवसाय विज्ञापन, कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी फायदा होईल असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *