या निर्लज्ज ‘सरकार’ विरोधात लढत राहणार – जयंत पाटील

२२ डिसेंबर २०२२

नागपूर


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे जयंत पाटील यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली असून विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे-फडणवीस सरकार निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, मी निर्लज्जपणा सारखे करू नका, असे आवाहन केले. मी माईक बंद करून बोललो होतो. विरोधी पक्षाचे आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा अमिरभाव पहिला आहे. ३२ ते ३३ वर्ष माझ्याकडून कधीही कुणाला अपशब्द वापरला गेला नाही. दुसरे प्रकरण टाळायचे होते म्हणून निलंबन केले. निर्लज्जपणा हा शब्द आपण सहजा सहजी वापरतो. कुणाचाही अवमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. तसेच, या निर्लज्ज ‘सरकार’ विरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *