अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या वडीलांवर चाकूने वार…

पिंपरी-चिंचवड
रोहीत खर्गे
विभागीय संपादक
दि.25/05/2021

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या वडिलांवर एका माथेफिरूने घरात घुसून चाकूने वार केल्याने ते जखमी झाले. ही घटना आज मंगळवारी दि. २५ मे रोजी सकाळी सातच्या सुमारास प्राधिकरण, निगडी येथे घडली…

यावेळी सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी यांनी त्या अज्ञात व्यक्तीला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि या झटापटीत ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांनतर त्यांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली होती. यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *