पिंपरी पेंढार येथील किल्ले बनवा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०८ नोव्हेंबर २०२२

पिंपरी पेंढार


पिंपरी पेंढार येथील सोशल युथ फाउंडेशनने दिपावली दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘किल्ले बनवा’ स्पर्धेत प्रचंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री सद्गुरू सीताराम महाराज मंदिरं सभागृहात पार पडला. संस्कार व समर्थ समीर कुटे या भावंडांनी तयार केलेल्या ‘राजगड ‘ किल्ल्यास प्रथम क्रमांक मिळाला.

दिपावली सणानिमित्त घरांसमोर किल्ले बनवण्याची परंपरागत प्रथा असून चिमुरडी मुले वेगवेगळे किल्ले तयार करतात. सोशल युथ फाउंडेशनच्या वतीने शाळकरी मुलांना शिवाजी महाराज व मावळे यांच्या कार्याची व विविध किल्ल्यांची माहिती व्हावी व कलागुणांना वाव मिळावा या हेतुने घरोघरी किल्ले बनवा स्पर्धाचे आयोजन केले जात आहे. यावर्षी ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, शालेय साहित्य देण्यात आले. द्वितीय क्रमांक क्षीतीज चंद्रशेखर पवार, तृतीय सान्वी विजय कुटे व चौथा क्रमांक आन्वी आशिष गाजरे यांनी बनवलेल्या किल्ल्यांना मिळाला. बक्षीस वितरण जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले सरपंच सुरेखाताई वेठेकर उपसरपंच अमोल वंडेकर विघ्नहर कारखाना संचालक राहुल जाधव, रोहिदास वेठेकर, रतन चव्हाण, ज्ञानेश्वर जोरी, सुखदेव कुटे, दत्तात्रय चव्हाण, किसन कुटे, रामदास वेठेकर, संतोष कुटे, बाळशिराम खिल्लारी, संदीप वाघ, रोटरी क्लबचे महावीर पोखरना, ज्ञानेश जाधव, विमलेश गांधी यांचे उपस्थितीत करण्यात आले. किल्ले परिक्षण जालिंदर चव्हाण व मंगेश देवगिरे , अमोल कुटे यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *