PMRDA (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) पुणे यांनी, काही हरकतींच्या सुनावणीसाठी संबंधितांनी उपस्थित राहण्याचे केलेय आवाहन

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
१२ एप्रिल २०२२

शिरूर


पुणे महानगर प्रदेशाची प्रारुप विकास योजना दि. ०२/०८/२०२१ रोजीच्या सुचने अन्वये प्रसिध्द झाली असुन, प्राप्त हरकती / सुचनांवर सुनावणी देणेसाठी, महानगर नियोजन समिती गठीत करण्यात आलेली आहे. प्राप्त हरकती / सुचनांवर दि. १८/०४/२०२२ ते २८/०४/२०२२ या कालावधीतील, सकाळी १०.०० ते १.३० व दुपारी २.३० ते ५.०० दरम्यान, लोणी काळभोर या विकसन केंद्रामधील १) मांजरी (बु.) २) शेवाळवाडी ३) मांजरी (खु.) ४) कदमवाकवस्ती ५) लोणी काळभोर ६) कोलवडी ७) पिसोळी ८) औताडे हांडेवाडी ९) होळकरवाडी १०) वडाचीवाडी ११) वडकी

खेड शिवापूर या विकसन केंद्रामधील १) कासुर्डी २) ससेवाडी ३) खेड शिवापूर ४) रामनगर ५) शिवापूर ६) वेळू ७) शिंदेवाडी ८) शिवरे या गावांकरीता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, आकुर्डी, पुणे – ४११०४४ येथे सुनावणीचा कार्यक्रम निश्चित करणेत आला आहे. सदर प्रारुप विकास योजनेवर विहीत वेळेत सुचना / हरकत सादर केलेल्या अर्जदारास, सुनावणीबाबतचा सविस्तर तपशिल रजिस्टर्ड पोस्टाद्वारे व एसएमएस (SMS) द्वारे कळविण्यात आलेले असुन, सदरचा सविस्तर तपशिल हा प्राधिकरणाच्या www.pmrda.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

अशा प्रकारची सुचना, महानगर आयुक्त तथा, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे, यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे काढलेली असून, संबंधितांनी दिलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्याचे व सुनावणींना हजर राहण्याचे आवाहन केलेले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *