पिंगळा या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
३ डिसेंबर २०२१

पुणे


पुणे येथे नुकतेच भटक्या विमुक्त जातीच्या प्रश्नांवर आधारित पिंगळा या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा श्रीमती विद्या कदम, कार्याध्यक्षा व प्रवक्ता श्रीमती फरझाना इक्बाल व नवनिर्वाचित सरचिटणीस डॉ.अलका नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. राईन पाडा गावातील एका सत्य घटनेवर आधारित भटक्या जातीतील हि घटना घडली आहे.पिंगळा या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक सनी शेख यांनी केले आहे. पिंगळा हा भटक्या विमुक्त जातीतील लोक अजूनही समाजातील काही घटकांपासून वंचित आहे, हे या समाजाचे दुर्दैव म्हणावे लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले.पिंगळा हा चित्रपट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांची गोवा येथील फिल्म फेस्टिव्हलच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी या चित्रपटातील प्रमुख कलाकार, कला दिग्दर्शक, आदी मान्यवर उपस्थित होते. लवकरच या चित्रपटाचे शुटिंग पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, मराठवाडा व इतर जिल्ह्यात केले जाईल असे या चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक सनी शेख यांनी यावेळी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *