श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपीवर खटला न चालवता भरचौकात फाशी द्या – संजय राऊत

१६ नोव्हेंबर २०२२


वसईच्या श्रद्धा वालकर खून प्रकरणाने देशात खळबळ माजली आहे. या प्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. खासदार संजय राऊत यांनी या खून प्रकरणातील मारेकऱ्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मारेकऱ्यावर खटले चालवू नका. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे त्याला भरचौकात फासावर लटकवा असे राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील मुलीची हत्या धक्कादायक आणि दुर्देवी आहे. समाजमाध्यमातून ओळखी होतात, त्यातून अशी भयंकर नाती निर्माण होतात. ही मुलं कोणत्या धुंदीत आणि गुंगीत जगत आहेत, हे आज परत एकदा कळलं आहे”, असे राऊत म्हणाले आहेत. “श्रद्धाचा खून विकृतीच्या पुढचं पाऊल आहे. या खून प्रकरणात राजकारण बंद केलं पाहिजे. यात राजकारण करणारे समाजाचे शत्रू आहेत”, अशी टीका त्यांनी केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांचा, कुटुंबाचा आक्रोश समजून घेतला पाहिजे,देशभरातील मुलींनी सावधपणे जगण्यास शिकलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *