वन्य प्राणी व बिबट्या यांच्या हालचाली टिपण्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव विभाग केंद्र सरकार यांच्या उपक्रमांतर्गत धनगरवाडी गावात लोखंडी बाँक्समध्ये बसविलेले सँटेलाईट कँमेरे गेले चोरीस…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

जुन्नर तालुका अखत्यारित धनगरवाडी गावांमधील येथे असलेल्या दोन तळ्यांच्या मधील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दोन झाडांना राष्ट्रीय वन्यजीव विभाग केंद्र सरकार यांच्या एका उपक्रमांतर्गत आपल्या परिसरातील बिबट्या तसेच इतर वन्य प्राणी यांच्या हालचाली, येण्याजाण्याच्या वेळा टिपण्यासाठी संबंधित विभागामार्फत लोखंडी बॉक्स मध्ये सॅटॅलाइट मार्फत नियंत्रित कॅमेरे दिनांक 5 एप्रिल 2021 रोजीबसविण्यात आले होते.


या बॉक्समधील कॅमेरे उत्सुकतेपोटी कोणीतरी 5 एप्रिल ते 19 एप्रिल या दरम्यान काढून नेले आहेत.
सदर कॅमेरे हे सॅटॅलाइट नियंत्रित असल्याने ते बंद अवस्थेत असताना देखील त्या ठिकाणाहून कुठे कुठे गेले आहे हे नियंत्रण कक्षाकडून समजते.
वनविभागाचे संबंधित प्रतिनिधी यांनी सदर कॅमेरे कोणाकडे असतील तर जमा करावेत असे सांगितले आहे.
तरी सदर कॅमेरा चे फोटो कोणाकडे आढळून आल्यास सदर कॅमेरे माझ्याकडे अथवा गावातील कुणाही जबाबदार व्यक्तींकडे जमा करावेत.. त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल ही माझी जबाबदारी राहील व
संबंधित प्रतिनिधी यांनी दोन दिवसात हे कॅमेरे जमा करावेत असे सांगितले आहे. केंद्र सरकारचा प्रोजेक्ट असल्यामुळे.. गुन्हा दाखल होऊ शकतो. कॅमेरा बंद अवस्थेत सुद्धा कुठून कुठे गेला हे गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित विभाग शोधू शकतो. तसेच
संबंधित विभाग आपल्या हितासाठीच काम करत आहे. जर कोणी
उत्सुकतेपोटी अथवा अजाणतेपणी हे कॅमेरे काढले असतील अथवा आपणास आढळल्यास कृपया सहकार्य करावे असे भावनिक व कडक आव्हाहन वन अधिकारी मनिषा काळे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *