१८ वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी. डी. काळे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व आंबेगाव तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सदर विशेष कॅम्प मध्ये 108 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन मतदार नोंदणी केली. याप्रसंगी विशेष निरीक्षक श्री.सुनील भेके,तलाठी श्री. राहुल पंदारे, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर, उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब गव्हाळे, राज्यशास्त्र विभाग समन्वयक व महाविद्यालयातील मतदार समन्वय अधिकारी प्रा.सुनील नेवकर, कार्यालयीन अधीक्षक श्री.अशोक काळे व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी तहसिलदार श्री.संजय नागटिळक तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.तुकाराम नामदेवराव काळे, उपाध्यक्ष श्री.शामशेठ होनराव, कार्याध्यक्ष श्री.राजेश काळे, सचिव श्री.अक्षय काळे, न्यू इंग्लिश मिडियम स्कूल कमिटीचे चेअरमन श्री.बाळासाहेब काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. मुकुंद काळे इ.चे मोलाचे सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *