सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डाक कर्मचाऱ्यांचा पुण्यात सत्कार संपन्न : बी पी एरंडे, अधीक्षक पुणे ग्रा.

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१२ फेब्रुवारी २०२२

पुणे


पुणे ग्रामीण विभागात चालू आर्थिक वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डाक कर्मचाऱ्यांचा सत्कार, पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधीक्षक बी पी एरंडे यांच्या हस्ते, दि. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवाजीनगर, पुणे येथे पार पडला.पुण्यासाठी आणखी एक गौरवाची बाब म्हणजे, पुणे ग्रामीण विभागाचा, नवीन खाते वृद्धीमध्ये महाराष्ट्रात पहिला क्रमांक आलेला आहे. त्याचप्रमाणे सुकन्या समृद्धी योजनेतही भरीव कामगिरी झालेली आहे. सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात, एकूण १०५ सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देण्यात आले.

सुकन्या योजनेची सर्वाधिक खाती काढल्याबद्दल, शिरूर पोस्ट ऑफिसचे सब पोस्टमास्तर अमोल साळवे सत्कार स्वीकारताना.

या कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. त्यात मुख्यालय सहाय्यक अधीक्षक एस आर साबळे, सहाय्यक अधीक्षक भूषण देशमुख, डाक निरीक्षक श्रीमती मानसी शर्मा, भोर उपविभागाचे सहाय्यक अधीक्षक एस बी भंडारी, सासवड उपविभागाचे डाक निरीक्षक एम एस मेढे, खेड उपविभागाचे डाक निरीक्षक पी टी भोगाडे व पश्चिम उपविभागाचे सहाय्यक अधिक्षक जी एच वडूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

IPBB अंतर्गत CELC मध्ये सर्व नागरिकांना आता आधार – मोबाईल लिंकिंग, प्रत्येक पोस्टमनच्या मोबाईल मधून पाच मिनिटांत होणार आहे. तसेच ५ वर्षांखालील बालकांचे आधारकार्ड हे सर्वच पोष्ट ऑफिसमध्ये विनामूल्य काढून मिळणार आहे.याचा लाभ घेण्याचे आवाहन पुणे ग्रामीणचे डाक विभागाचे अधीक्षक बी पी एरंडे यांनी केलेय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *