असल्या कायद्यांना काय चुलीत घालायचं का…? असे का म्हणाले सरपंच योगेश पाटे

मला जे योग्य वाटेल ते मी करणार – सरपंच योगेश पाटे

शिवभोजन थाळी शुभारंभ प्रसंगी पत्रकार परिषदेत सरपंच योगेश पाटे यांचे वक्तव्य

नारायणगाव: (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
“आपण सामाजिक कार्यात काम करत आहोत, त्यामुळे गुन्हे दाखल होत असतात. पण असल्या गुन्ह्यांना सरपंच बाबू पाटे भीक घालत नाही” असं स्पष्टीकरण आज नारायणगाव चे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांनी माध्यमांना केले. मागील ८ दिवसांपासून बाबू पाटे फरार होते. जामीन घेतल्यानंतर आज ते बोलत होते.
राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान तर्फे आज नारायणगाव येथे शिवभोजन थाळी चा उपक्रम सुरू करण्यात आला.शासनाचा ७५ थाळी देण्याचा मानस असला तरी नारायणगाव मधील जेवढ्या लोकांना गरज आहे त्यांना ही थाळी मोफत देण्यात येणार आहे.अस यावेळी सरपंच पाटे यांनीं पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी आशिष माळवदकर, आरिफ आतार, संतोष दांगट, ईश्वर पाटे, राजू पाटे, संतोष पाटे, पवन आहेर, राजेश बाप्ते, निलेश जाधव, आकाश कानसकर, विटे, काका नेवकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी योगेश पाटे यांनी मागील काही दिवसांपासून आपल्यावर होत असलेल्या आरोपांचे खंडण केले. आपण समाजासाठी काम करत आहे. यातून जर असे गुन्हे दाखल होत असतील तर काही हरकत नाही.
नारायणगाव ग्रामपंचायतीने उभारलेल्या शवदाहिनीत आतापर्यंत ५०० मृतदेहावर अंत्यसंस्कार केले असून पत्रकारांनी बातमी देताना वस्तू स्थिती पाहून बातम्या कराव्या. नारायणगाव परिसरात कोरोना रुग्ण वाढतायेत यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत यावर बोलताना ते म्हणाले की, आयसोलेशन व हायपोक्लोराइडच्या फवारण्या सुरू आहेत.
तुम्ही व्यापा-यांना धमकावत आहात त्यामुळे व्यापारी नाराज आहेत असा सूर आहे. या प्रश्नावर बोलताना, असं काही नाही. कोणाची याबाबत तक्रार नाही अस स्पष्टपणे सांगत या आरोपांचे खंडण केले.
आपण सामाजिक विषयात उतरलो आहोत. त्यामुळे गुन्हे दाखल होत असतात पण असल्या गुन्ह्यांना बाबू पाटे भीक घालत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकांसाठी काही गुन्हे अंगावर घ्यायला लागले तर काही हरकत नाही.
टोल नाक्यावर सुद्धा मी स्थानिक नागरिकांच्या प्रश्नाला घेऊन गेलो होतो त्यामुळे जरी गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही. २०१७ सालचा अरुण पाटे यांच्या संदर्भातला गुन्हा आहे त्यात माझं एफआरआय मधे कुठेही नाव नव्हतं. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यावर ८ दिवस कोर्ट बंद होत. त्यामुळे बाहेर जावं लागलं. याचा कोणताही राजकीय इश्यू कोणी करू नये असं आवाहन पाटे यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *