अरे हा कुणाच्या बापाच्या घरचा निधी आहे का?; फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर

१० डिसेंबर २०२२


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावर टीका करताना तीन वर्षे निर्णय न घेता स्थगिती देण्यातच वाया गेली अशी टीका केली. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगित कामांवर फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.अरे कुणाच्या बापाच्या घरच्या निधी आहे का? असा प्रश्नही विचारला.

अजित पवार म्हणाले, आम्हीही सरकारमध्ये होतो. मी स्वतः सरकारमध्ये असताना अर्थसंकल्पात जे जाहीर केलं होतं त्यालाही या सरकारने स्थगिती दिली त्यामुळे अनेक गावांचा निधी थांबला. अरे हा कुणाच्या बापाच्या घरचा निधी आहे का ? सरकारचा निधी आहे न. तुमचं सरकार आहे तर तुम्ही नवीन मंजुऱ्या द्या ना, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *