
रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- दि २१ जून २०२१
पिंपरी चिंचवड महापालिकेचा ‘आंधळे दळतंय आणि कुत्रे पीठ खातय ‘ असाच कारभार सुरू आहे.भर पावसात रत्यांवरील डांबरांची कामे होताना दिसत आहेत.भर पावसाळ्यात खोदाई सुरू आहे.त्यामुळे सामान्य नागरिक तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करीत आहेत.रस्तांची कामे मुदतीत पूर्ण न करणार्या ठेकेदाराला जाब विचारण्याची हिंमत टक्केवारीमुळे लाजार झालेल्या नगरसेवकांकडे नाही.त्यामुळे सामान्य नागरिकांना शारीरिक मानसिक,आर्थिक,मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सामान्य नागरिकांचे आरोग्य रामभरोसे असुन ते धोक्यात आले आहे.पावसामुळे मच्छरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यामुळे डेंग्यू,मलेरिया,चिकनगुनिया सारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या अशा कारणांमुळे पाण्यात जाणारा पैसा हा आमच्या कष्टातून घाम गाळून तो वेगवेगळ्या करांच्या रुपाने आमचाच असतो आणि त्याचा विश्वस्त म्हणून नगरसेवक अशा प्रकारे विनियोग करतात.याचा जाब करदाते नागरिक ठामपणे पुढे येऊन विचारत नाहीत हे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

जो पर्यंत निर्भिडपणे नागरिक पुढे येऊन हा जाब आपल्या लोकप्रतिनिधींना विचारत नाही.तोपयंत हे असेच चालत राहणार ऐवढे मात्र नक्की……
असे आपला आवाजकडे बोलताना सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले.