अखेर सिंकदर शेखने या वर्षीची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली…
अखेर सिंकदर शेखने यावर्षीची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. त्याने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे याला आस्मान दाखवले. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मिलेटरी स्कूलच्या मैदानावर पार पडली.पैलवान सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. त्याने महाराष्ट्र केसरी २०२३ च्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे याचा पराभव केला. सिंकदरने अवघ्या १० सेंकदार मैदान मारले. त्याने झोळी डाव टाकून शिवराजला चीत केले आणि ६६ वा महाराष्ट्र केसरी बनण्याचा बहुमान मिळवला.
यंदा शिवराजकडे सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बनण्याची संधी होती. पण सिंकदरने तसे होऊ दिले नाही.
दरम्यान, सिंकदर शेख गेल्या वर्षी सेमी फायनलमध्ये पराभूत झाला होता. पण त्यानंतर तो सोशल मीडियावर हिरो ठरला. गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरवर अन्याय झाल्याचे अनेक चाहत्यांचे आणि कुस्ती तज्ज्ञांचे मत होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सिंकदरच्या बाजूने एक भावनिक लाट उसळली होती.
